मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ही तर आईसारखी दिसते; आराध्याचा बदलेला लूक पाहून नेटकरी फिदा

Viral Video: ही तर आईसारखी दिसते; आराध्याचा बदलेला लूक पाहून नेटकरी फिदा

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 05, 2024 04:33 PM IST

Aradhya Bachchhan Viral Video: बच्चन कुटुंबीयांनी नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्रीवेडींग फंक्शनला हजेरी लावली. आराध्याचा बदलेला लूक पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

Aradhya Bachchhan Viral Video
Aradhya Bachchhan Viral Video

Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. बच्चन कुटुंबीय शेवटच्या दिवशी म्हणजेच ३ मार्च रोजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. दरम्यान, आराध्या बच्चनच्या बदलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील ऐश्वर्या, अभिषेक व आराध्या यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते तिघेही प्री-वेडिंगमधील परफॉर्मन्सचा आनंद घेताना दिसत आहेत. व्हिडीओत ते तिघेही एकत्र बसल्याचे दिसत आहे. ऐश्वर्या व आराध्या टाळ्या वाजवून कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत, तर अभिषेकही नंतर त्यांच्यामध्ये सामील होतो. त्यानंतरच्या व्हिडीओमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या एकत्र चालत असतात. ऐश्वर्या अचानक आराध्याला मीडियाच्या समोरुन चालताना सांगते. आराध्याचा बदलेला लूक पाहून सर्वजण चकीत होतात.
वाचा: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्...; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर आराध्याचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'अखेर आराध्याची हेअरस्टाइल बदलली, अखेर इतक्या वर्षांनी आराध्याचं कपाळ दिसलं' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ती आई सारखी सुंदर दिसते असे म्हणत आराध्याची प्रशंसा केली आहे. तिसऱ्या एका यूजरने अभिषेकचं कुटुंब खूप चांगलं आहे, आराध्या व ऐश्वर्या सुंदर दिसत आहेत अशी कमेंट केली आहे.
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंकशनमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये ‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिलिसाचा देखील समावेश आहे. बॉलिवूडमधून शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, किरण राव, जितेंद्र, करीना कपूर खान, सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीश्मा कपूर, रितेश देशमुख, जिनिलिया, दीपिका पादूकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली.
वाचा: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

कधी होणार लग्न?

गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

WhatsApp channel

विभाग