संगीतकार ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रेहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. या बातमीने रेहमानच्या चाहत्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी ए. आर. रेहमान यांनी पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्याची बातमी समोर आल्यानंतर रहमान आणि मोहिनी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. मोहिनीमुळे एआर रेहमानने पत्नीला घटस्फोट दिल्याचे लोकांनी म्हटले. अशातच आता एआर रेहमान यांचा मुलगा अमीन याने या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.
ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन याने वडील आणि मॅनेजर मोहिनी डे यांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यावर लिहिले आहे की, त्यांच्यात कोणताही संबंध नाहीत. यासोबतच अमीन यांनी एक लांबलचक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
"माझे वडील एक महान व्यक्ती आहेत, केवळ त्यांच्या अतुलनीय योगदानासाठीच नव्हे तर त्यांनी वर्षानुवर्षे कमावलेल्या मूल्ये, आदर आणि प्रेमासाठी. खोट्या आणि निराधार अफवा पसरवल्या जात आहेत हे पाहून वाईट वाटते. एखाद्याच्या आयुष्याबद्दल आणि वारशाबद्दल बोलताना आपण सर्वांनी सत्य आणि आदराचे महत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. कृपया अशा चुकीची माहिती पसरवणे किंवा त्याचा भाग बनणे टाळा. त्यांच्या प्रतिष्ठेबरोबरच या गोष्टींचा आपल्या सर्वांवर होणारा परिणामही आपण जपला पाहिजे" या आशयाची पोस्ट अमीनने केली आहे.
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
रहमानचा घटस्फोट त्याची पत्नी सायराच्या वकील वंदना यांच्यावतीने सार्वजनिक करण्यात आला आहे. लग्नाला इतकी वर्षे झाल्यानंतर सायरा यांनी पती ए. आर. रेहमान यांच्यापासून विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सतत तणाव निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द रेहमाननेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून आपण लवकरच ३० च्या टप्प्यावर पोहोचू असे वाटले होते पण तसे होऊ शकले नाही असे म्हटले.
संगीत दिग्दर्शकांचा मुलगा ए. आर. अमीन यांच्यानंतर ए. आर. रहिमा आणि खतीजा यांचे जबाब समोर आले. आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल रहिमाने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, "जर या प्रकरणाला पूर्ण आदर आणि गोपनीयतेने वागवलं गेलं तर मला खूप आनंद होईल. समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. " खतीजा यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “ आम्ही तुम्हा सर्वांना या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्यास सांगतो. आम्हाला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. याआधी अमीन यांनी प्रायव्हसी देण्याबाबतही बोलले होते. ”