लग्नाच्या २९ वर्षांनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि म्यूझिक कम्पोझर ए. आर. रहमान पत्नी सायरा बानोला घटस्फोट देत आहे. लग्नाच्या २९ वर्षांनंतर दोघांनी हा निर्णय घेतला आहे. ए. आर. रेहमान आणि सायरा यांना तीन मुले आहेत. आता घटस्फोटाच्या निर्णयानंतर त्यांनी निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी प्रायव्हसी देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करावा असे देखील म्हटले आहे. तसेच आता ए. आर. रेहमानने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.
रेहमानने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. "आम्ही ग्रँड 30 पर्यंत पोहोचण्याची आशा करत होतो, परंतु असे दिसते की सर्व गोष्टी अदृश्य होऊन संपण्याच्या मार्गावर आहेत. देवाचे सिंहासनही तुटलेल्या अंतःकरणाच्या ओझ्याने थरथरते. तरीही आपण या विघटनात काही अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. जरी हे तुकडे कधीही पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. या कठीण काळातून जात असताना आपल्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद" या आशयाची पोस्ट रेहमनानने केली आहे.
लग्नाला ३० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ए. आर. रेहमान आणि त्याची पत्नी विभक्त होत आहेत. पत्नी सायरा बानो यांच्या वकील वडाना शाह यांनी सांगितले की, "लग्नाच्या अनेक वर्षांनंतर श्रीमती सायरा यांनी पती ए. आर. रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा हा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अतुलनीय प्रेम असूनही या तणावामुळे त्यांच्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे दोघांच्याही लक्षात आले. "
वाचा: ८ अफेअर्स, ३ लग्न करुनही आज आहे एकटी, पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही झीनत अमान
ए. आर. रेहमान यांना तीन मुले आहेत. आई-वडीलांच्या निर्णयानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लोकांना या कठीण काळात प्रायव्हसी देण्याचे आवाहन केले आहे. रहमानची मुलगी रहिमाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं आहे - जर हे प्रकरण पूर्ण आदराने आणि गोपनीयतेने हाताळले गेले तर मला खूप आनंद होईल. समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. खतीजा म्हणाली, "आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. आम्हाला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार."