AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्...

AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्...

Nov 20, 2024 08:50 PM IST

AR Rahman Divorce : एआर रहमान आणि सायरा यांनी एकत्र विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच दोघांचा घटस्फोट होणार आहे. या दोघांनी सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.

एआर रहमान
एआर रहमान

AR Rahman Divorce : जगप्रसिद्ध गायक-संगीतकार एआर रहमान यांनी आणि त्यांची पत्नी सायरा यांनी मंगळवारी विभक्त होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. एआर रहमान यांनी देखील पुन्हा एक निवेदन जारी करून, ते दोघे आता विभक्त होत असल्याचे म्हटले आहे. या दोघांनी २९ वर्षांचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एवढं दीर्घकालीन नातं मोडण्याचा निर्णय घेतला आहे, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. काही दिवसांपूर्वी दोघांशी संबंधित काही जुने किस्से व्हायरल झाले होते. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोघांची हनिमून स्टोरी सांगितली जात आहे. हनिमूनच्या दिवशी देखील दोघांच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली होती. सायराला त्या रात्री रहमान कुठे होता, हेच माहित नव्हतं.

रहमानच्या भावाने एका मुलाखतीत किस्सा सांगताना म्हटले होते की, ‘मला आठवते जेव्हा रहमानचे लग्न झाले, तेव्हा तो माझ्या वहिनीला एका हिल स्टेशनवर हनिमूनला घेऊन गेला होता. त्या रात्री मी त्यांना फोन केला होता. रात्रीचे १२-१ वाजले असतील. सायरा वहिनीने माझा फोन उचलला आणि झोपेत होती. मी तिला रहमान कुठे आहे, असे विचारले. तर, तिने उत्तर देताना म्हटले की, मला माहित नाही. त्यावेळी रहमान दुसऱ्या खोलीत वीणा वादनाचा सराव करत होता. त्याच्या डोक्यात कधीही कोणतीही धून येऊ शकते. असाच आहे आमचा रहमान.’

AR Rahman Divorce: प्रत्येक नात्याचा शेवट वाईट असतो; घटस्फोटानंतर ए.आर. रेहमानची पहिली पोस्ट

घटस्फोटानंतर काय म्हणाला रहमान?

एआर रहमानने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. या विभक्त होण्याच्या निवेदनात त्याने लिहिले की, ‘आम्हाला वाटले होते की, आम्ही लग्नाची ३० वर्षे पूर्ण करू, परंतु आता सगळं संपलं आहे. देवाचे सिंहासनही तुटलेल्या  हृदयाच्या ओझ्याखाली थरथरू शकते. तरीही, या कंपनात देखील आपण अर्थ शोध राहतो, मात्र तुकड्यांना त्यांची जागा पुन्हा मिळू शकत नाही. आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक परिस्थितून जात असताना तुम्ही दाखवलेल्या या दयाळूपणाबद्दल आणि आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद. #अरसायरा ब्रेकअप।’

सुप्रसिद्ध गायक एआर रहमान आणि सायरा यांनी अरेंज मॅरेज केले होते. त्यांना तीन मुले आहेत. त्यांच्या मुलींची नावं खतीजा आणि रहिमा अशी आहेत. तर, मुलाचे नाव अमीन रेहमान आहे.

Whats_app_banner