नुकताच ६४ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा धुमधडक्यात पार पडला. २०२२ ग्रॅमी पुरस्कार सोहळा हा ग्लॅमरस इवेंट होता. या पुरस्कार सोहळ्याला लेडी गागापासून ते BTS ग्रूपने हजेरी लावली. म्यूझिक कंपोजर आणि गायक ए.आर. रहमान यांनी देखील ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांचा मुलगा देखील सोबत होता.
ए. आर रहमान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ए. आर रहमानला ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात पाहून सर्वांना आनंद झाला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ए. आर रहमान मुलगा ए. आर. आमीनसोबत दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२००९ साली प्रदर्शित झालेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटातील 'जय हो' गाण्याला ए. आर. रहमान यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना सहा नॅशनल फिल्म आणि १५ फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. आमीन देखील एक गायक आहे. त्याने २०१५मध्ये तमिळ चित्रपट O Kadhal Kanmaniमध्ये गाणे गात करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील म्यूझिक ए. आर. रहमान यांनी कंपोज केले आहे. ए. आर. आमीनने तमिळ आणि तेलुगू शिवाय मराठी आणि हिंदी भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. तो काही म्यूझिक व्हिडीओमध्ये देखील दिसला होता.