तीन मुलांचे वडील ए. आर. रहमान लग्नाच्या तब्बल २९ वर्षांनंतर पत्नीपासून विभक्त होणार आहेत. सायरासोबत अरेंज मॅरेज केलेले ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांनी भावनिक तणावामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ए. आर. रहमान यांच्या मुलींनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. रहमानच्या तिन्ही मुलांनी या कठीण काळात आपल्या प्रायव्हसीचा आदर करावा, असे आवाहन केले आहे.
संगीत दिग्दर्शकांचा मुलगा ए. आर. अमीन यांच्यानंतर ए. आर. रहिमा आणि खतीजा यांचे जबाब समोर आले. आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल रहिमाने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, "जर या प्रकरणाला पूर्ण आदर आणि गोपनीयतेने वागवलं गेलं तर मला खूप आनंद होईल. समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. " खतीजा यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “ आम्ही तुम्हा सर्वांना या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्यास सांगतो. आम्हाला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. याआधी अमीन यांनी प्रायव्हसी देण्याबाबतही बोलले होते. ”
रहमानचा घटस्फोट त्याची पत्नी सायराच्या वकील वंदना यांच्यावतीने सार्वजनिक करण्यात आला आहे. लग्नाला इतकी वर्षे झाल्यानंतर सायरा यांनी पती ए. आर. रेहमान यांच्यापासून विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सतत तणाव निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खुद्द रेहमाननेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून आपण लवकरच ३० च्या टप्प्यावर पोहोचू असे वाटले होते पण तसे होऊ शकले नाही असे म्हटले.
वाचा : ८ अफेअर्स, ३ लग्न करुनही आज आहे एकटी, पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही झीनत अमान
'ए. आर. रहमान : द स्पिरिट ऑफ म्युझिक' या पुस्तकासाठी नसरीन मुन्नी कबीर यांना दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी त्यांची आणि सायराची भेट कशी झाली हे सांगितले होते. रेहमान यांनी सांगितले की, १९९४ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी निर्णय घेतला होता की, आता लग्न करावे. स्टार संगीतकाराला काही कारणास्तव वाटले की तो आता म्हातारा होत आहे. रहमानची आई आणि बहीण फातिमा यांची सायराशी पहिली भेट चेन्नईतील सूफी आणि मोतीबाबा यांच्या दर्ग्यात झाली होती.
संबंधित बातम्या