मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  AR Rahman: नावासोबतच एआर रहमान यांनी बदलला होता धर्म! तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

AR Rahman: नावासोबतच एआर रहमान यांनी बदलला होता धर्म! तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

Jan 06, 2024 02:31 PM IST

AR Rahman Birthday Special: संगीतकार ए.आर. रहमान यांनी केवळ बॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपल्या संगीताचा ठसा उमटवला आहे.

AR Rahman Birthday Special
AR Rahman Birthday Special

AR Rahman Birthday Special: आपल्या आवाजाने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या ए.आर. रहमान यांचा आज (६ जानेवारी) वाढदिवस आहे. संगीतकार ए.आर. रहमान यांनी केवळ बॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपल्या संगीताचा ठसा उमटवला आहे. अवघ्या जगाने त्यांच्या या कौशल्याचं कौतुक केलं आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीतकारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. ६ जानेवारी १९६७मध्ये चेन्नई येथे ए.आर. रहमान यांचा जन्म झाला. आज त्यांचा ५७वा वाढदिवस आहे. चला तर याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

संगीतकार ए आर रहमानचा जन्म हिंदू म्हणून झाला होता. त्यांचे नाव दिलीप कुमार होते. पण, नंतर त्यांच्या आयुष्यात एक अतिशय कठीण काळ आला होता. त्यांची धाकटी बहीण एकदा खूप आजारी पडली होती. त्यावेळी तिच्यावर एका मुस्लिम सूफी संतांनी उपचार केले होते. त्यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी आपला धर्म बदलला. यासोबतच त्यांनी आपले नाव दिलीप कुमारवरून अल्ला रक्खा रहमान अर्थात ए.आर. रहमान असे केले.

Malaika Arjun Breakup: काय? दोन महिन्यांपूर्वीच झालाय अर्जुन-मलायकाचा ब्रेकअप! पण...

ए.आर. रहमान हे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची ख्याती इतकी मोठी आहे की, कॅनडाच्या ओंटारियो शहरातील मर्खम भागातील एका संपूर्ण रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रमुग्ध संगीतासाठी जगभरात ओळखल्या जाणार्‍या ए.आर. रहमान यांना प्रत्यक्षात या क्षेत्रात येण्याची इच्छा नव्हती. ए.आर. रहमान यांना कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे होते. त्यांनी कधीच संगीत क्षेत्रात यायचा विचारही केला नव्हता. मात्र, हळूहळू ते संगीत क्षेत्राकडे वळले.

ट्रेंडिंग न्यूज

ए.आर. रहमान यांच्या 'जय हो' या लोकप्रिय गाण्याचं जगभरात कौतुक झालं. आजही रसिक श्रोत्यांना हे गाणे खूप आवडते. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या गाजलेल्या चित्रपटातील हे गाणे, खरे तर सलमान खान अभिनित ‘युवराज’ या चित्रपटासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, ते ‘स्लमडॉग मिलेनियर’मध्ये वापरण्यात आले. ए.आर. रहमान यांनी अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपट आणि प्रोजेक्टसाठी गाणी संगीतबद्ध केली आहेत. डेन्झेल वॉशिंग्टन स्टारर चित्रपट ‘इनसाइड मॅन’मध्ये त्यांनी संगीतबद्ध केलेले ‘छैय्या छैय्या’ हे गाणे वापरण्यात आले होते.

WhatsApp channel