मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एक-दोन नव्हे, तब्बल १० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी

एक-दोन नव्हे, तब्बल १० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 01, 2024 09:02 AM IST

एप्रिल महिन्यात एक-दोन नव्हे तर, तब्बल १० बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्यात ओटीटीसोबतच चित्रपटगृहांमध्ये देखील मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे.

१० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी
१० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी

मार्च महिना बॉलिवूडसाठी खूप चांगला होता आणि आता एप्रिल महिना आणखीनच मनोरंजक असणार आहे. एप्रिल महिन्यात एक-दोन नव्हे तर, तब्बल १० बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्यात ओटीटीसोबतच चित्रपटगृहांमध्ये देखील मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे. या यादीत 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'मिस्टर चमकिला' आणि अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटांचा समावेश आहे. चला तर पाहूया एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी...

बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. अली अब्बास जफरचा हा चित्रपट ॲक्शनने परिपूर्ण असणार आहे. मानुषी छिल्लर आणि आलिया एफ देखील या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जो १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असल्याने, तो चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

मैदान

'शैतान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट त्याची दुसरी मोठी कामगिरी ठरू शकते. या चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बोनी कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाची कथा फुटबॉलच्या माध्यमातून भारताचे वैभव परत आणणाऱ्या सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असेल. ट्रेलरची बरीच चर्चा झाली होती आणि आता १० एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत.

अमरसिंह चमकीला

‘अमरसिंह चमकीला’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा दिसणार आहेत. पंजाबी गायक अमरसिंह चमकीला यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात परिणीती अमरजोतची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

लव्ह, सेक्स और धोका २

दिबाकर बॅनर्जीचा ‘LSD2’ हा चित्रपट देखील या महिन्यातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिला भाग सुपरहिट असल्याने चाहत्यांना दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे पोस्टर यापूर्वीच रिलीज करण्यात आले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रुसलान

'अंतिम' चित्रपटानंतर आता अभिनेता आयुष शर्मा पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ‘रुसलान’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, त्यात आयुष शर्मासोबत सुश्री मिश्रा देखील दिसणार आहे. करण एल बुटानी दिग्दर्शित या चित्रपटात जगपती बाबू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

फॅमिली स्टार

साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या 'फॅमिली स्टार' या चित्रपटाचीही चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. परशुराम पेटला दिग्दर्शित या चित्रपटात विजय चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...

मिस्टर आणि मिसेस माही

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपटही एप्रिल महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी १९ एप्रिलची निवड केली आहे. धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाबद्दल आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रमोशन केले होते.

याशिवाय तमन्ना भाटिया स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'अरनमानाई ४', विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांचा 'दो और दो प्यार' आणि बजरंगबलीच्या कथेपासून प्रेरणा घेऊन बनवलेला ‘मंकी मॅन’ हे चित्रपटही एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. या तिन्ही चित्रपटांबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यातील कोणता चित्रपट लोकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग