Appi Amchi Collector: अप्पी- अर्जुनवर नवे संकट, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Appi Amchi Collector: अप्पी- अर्जुनवर नवे संकट, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण

Appi Amchi Collector: अप्पी- अर्जुनवर नवे संकट, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 15, 2025 02:45 PM IST

Appi Amchi Collector: 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत आता वेगळे वळण आले आहे.

Appi Amchi Collector
Appi Amchi Collector

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'अप्पी आमची कलेक्टर.' या मालिकेतील अप्पी, अर्जुन आणि अमोल हे सर्वांची मने जिंकताना दिसत आहेत. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात मोठे संकट आले आहे. या संकाटाचा दोघे कसा सामना करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अप्पी- अर्जुनावर GG नावच संकट येणार आहे याची चाहूल लागली आहे. अप्पीला वाटतंय की आता सगळं ठिक आहे. पण अमोलच्या देखभालीवरून रुपाली आणि मोना मध्ये वाद होतो. रुपालीचा आरोप आहे की मोना बेफिकीर आहे, पण मोना हे गैरसमज असल्याचं समजावण्याचा प्रयत्न करते. अप्पीला दोघींमधला तणाव जाणवतो. ती त्यांना एकत्र आणत गैरसमज दूर करते.

दरम्यान, अप्पी जेव्हा GG बरोबर बालमजुरी प्रकरणावर भिडते, तेव्हा तो त्या गोष्टीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करतो. तो सांगतो की त्याच्या एका माणसाने हे कृत्य केलं आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात मी देत आहे. GG आपलं नाव साफ ठेवत प्रसारमाध्यमांना सांगतो की त्याने पोलिसांना मदत केली आहे. यामुळे अप्पी आणि अर्जुन चिंतेत आहेत. चिंचुके ठामपणे सांगतो की GG सुटता होता कामा नये. अप्पी GG ला सापळ्यात अडकवण्याचा प्लॅन आखते.

आर्याच्या मदतीने ती एका पत्रकाराला माहिती लीक करते की एक मुलगा GG विरोधात साक्ष देणार आहे आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवले जाणार आहे. ही बातमी ऐकून GG हादरतो. GG आपल्या गुंडांना त्या मुलाला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचे आदेश देतो. त्या रात्री, गुंड मुलाला सोडवण्यासाठी येतात, पण अप्पी, अर्जुन आणि चिंचुके त्यांना रंगेहाथ पकडतात.
वाचा: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी

दुसरीकडे, घरी मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळी अप्पी आणि अर्जुन घरी नसल्यामुळे कुटुंबीय काळजीत आहेत. अप्पी आणि अर्जुन पत्रकारासमोर गुन्हेगाराला सादर करतात . GG थक्क होतो. दुसऱ्या दिवशी, अप्पी आणि अर्जुन GG ला अटक करण्यासाठी जातात. GG त्यांच्याविरुद्ध बदला घेण्याची शपथ घेतो. दरम्यान, GG चा गुंड कोर्टात असं काही करतो ज्यांनी सर्व खेळचं उलटा पडतो. आता GG अप्पीचा खेळ कायमचा संपवायचा प्लॅन आखतोय. त्या रात्री, अप्पी बापूला सांगते की आता त्यांचे संघर्ष आणि परीक्षेचा काळ संपला आहे. यावर बापू तिला आठवण करून देतात की परीक्षा कधीच संपत नाही.

Whats_app_banner