गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर विराट किंवा अनुष्काने शिक्कामोर्तब केले नव्हते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरुन अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्काचा बेबी बंप दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर बंगळुरूच्या हॉटेलमधील अनुष्का आणि विराटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा शिफली ड्रेस परिधान केला आहे. तर विराटने राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचा बेपी बंप दिसत आहे. त्यामुळे ती खरच प्रेग्नंट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा: यशने दिली प्रेमाची कबूली, काय असेल आरोहीची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने “…म्हणून वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी अनुष्का येत नाहीये” असे म्हटले. तर दुसऱ्या यूजरने अनुष्का-विराट तुम्हाला दुसऱ्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा” असे म्हटले. तिसऱ्या एका यूजरने “अनुष्का शंभर टक्के गरोदर आहे” असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर अनुष्का आणि विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केले. त्यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. २०२१मध्ये वामिकाचा जन्म झाला. अनेकजण वामिकाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, विराट-अनुष्काने तिचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. आता अनुष्का पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे पाहायला मिळते.