Virat Kohli & Anushka Sharma : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अनुष्काने-विराटने २० फेब्रुवारी रोजी चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली. मात्र, खरंतर त्यांच्या बाळाचा जन्म आधी झाला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे बोलले जात होते. पण या दोघांनीही याबाबत काहीच सांगितले नव्हते. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीदरम्यान दोघांचे हे गुपित उघड केले होते. पण यानंतर डिव्हिलियर्सने हे खोटे असल्याचे सांगितले होते.
वाचा: अमेरिकेत शिवजयंती! अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला
आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी स्वतःहून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली आहे. या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने, आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देत आहोत. १५ फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक मुलगा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय (Akaay) याचा जन्म झाला. या काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. सोबतच आम्हाला प्रायव्हसी देण्याची मागणीही करत आहोत."
दरम्यान, आता विराट-अनुष्काची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. दोघांचेही चाहते अतिशय आनंदी आहेत. त्यांनी दोघांनाही शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. तर लहान बाळाला आशीर्वाद मिळत आहेत. अभिनेता रणवीर सिंग, सोनम कपूर, रकुल प्रीत सिंगसह अनेक सेलिब्रिटींनीही विराट आणि अनुष्काचे अभिनंदन केले आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते. हे लग्न इटलीतील टस्कनी येथे एका शानदार सोहळ्यात पार पडले. यामध्ये त्यांचे दोन्ही कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी या जोडप्याला एक मुलगी झाली. तिचे नाव वामिका असून आता दोघेही एका मुलाचे पालक झाले आहेत.
संबंधित बातम्या