
Anushka Sharma and Virat Kohli at Mahakaleshwar Temple: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी नुकतीच उज्जैनमधील ‘महाकालेश्वर’ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ही जोडी भस्म आरतीत देखील सामील झाली होती. दोघांनी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली. यावेळी अनुष्का शर्मा हिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर, विराट कोहली याने गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावर चंदन टिळा लावला होता. तर, धोती आणि बनियान परिधान करून त्याने या पूजेत सहभाग घेतला.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे पती-पत्नी पहिल्याच रांगेत बसून महादेवाची पूजा करताना दिसत आहेत. यानंतर दोघांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन देखील केले. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या जोडीने माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण महादेवाचे दर्शन घ्यायला आलो होतो, असे म्हटले आहे.
शनिवारी सकाळीच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले होते. पाहते चार वाजता होणाऱ्या महाकाल भस्म आरतीत ही जोडी सामील झाली होती. यावेळी दोघांनी महादेवाचा आशीर्वाद घेतला. नेहमीच लाईमलाईटमध्ये राहणारे विराट आणि अनुष्का सध्या भक्तीत लीन झाले आहेत. या आधी विराट आणि अनुष्का यांनी बाबा नीम करोली आश्रमात जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी ही जोडी दोन दिवस वृंदावनमध्ये भक्तीत रममाण झाली होती. यानंतर या जोडीने आनंदमई आश्रमात जाऊन तेथील संतांचे दर्शन घेतले होते.
संबंधित बातम्या
