मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anurag Kashyap Statement: मी नास्तिक आहे कारण...; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काय म्हणाला अनुराग कश्यप?

Anurag Kashyap Statement: मी नास्तिक आहे कारण...; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काय म्हणाला अनुराग कश्यप?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 08, 2024 05:41 PM IST

Anurag Kashyap Statement on Ram Mandir: नुकत्याच एका कार्यक्रमात अनुराग कश्यपने राम मंदिराच्या उद्घाटनाला ‘धर्माचा धंदा’ म्हटले आहे.

Anurag Kashyap Statement on Ram Mandir
Anurag Kashyap Statement on Ram Mandir

Anurag Kashyap Statement on Ram Mandir: बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. अनुराग कश्यप नेहमीच असं काही तरी बोलून जातो, ज्यामुळे त्याच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होतात. आता देखील अनुराग कश्यप याने असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात अनुराग कश्यपने राम मंदिराच्या उद्घाटनाला ‘धर्माचा धंदा’ म्हटले आहे. अनुरागच्या या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर बरीच टीका केली जात आहे.

कोलकाता येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अनुराग कश्यप म्हणाला की, ‘मंदिराचे उद्घाटन ही एक जाहिरातबाजी होती, जी भारताला दोन गटात विभागण्यासाठी केली गेली आहे. जेव्हा माणसाकडे काहीच उरत नाही, तेव्हा तो धर्माकडे वळतो. अयोध्येत रामाचे नाही, तर राम लल्लाचे मंदिर बांधले आहे. लोकांना तर यातला फरक कळत नाही. २२ जानेवारीला जे काही घडलं, ती फक्त एक जाहिरात होती. मी तरी त्याकडे याच दृष्टीने पाहतो. तीच जाहिरात बातम्यांमध्ये सुरू होती. ही २४ तासांची जाहिरातबाजी होती. मी नास्तिक असण्याचे मुख्य कारण म्हणजे माझा जन्म वाराणसीत झाला आहे. हा धर्माचा धंदा मी अगदी जवळून पाहिला आहे.’

Viral Video: विमातळावर व्हिडीओ घेत असलेल्या चाहत्याला पाहून सलमान खान चिडला! हातवारे करत म्हणाला...

ते राम मंदिर नाहीच!

पुढे बोलताना अनुराग कश्यप म्हणाला की, 'सगळेच याला राम मंदिर म्हणतायत. पण, ते कधीच राम मंदिर नव्हते. हे मंदिर राम लल्लाचे मंदिर आहे. आणि संपूर्ण देश यातील फरक सांगू शकत नाही. धर्म हा दुष्टांचा शेवटचा आश्रय आहे, असे कोणीतरी म्हटले आहे. जेव्हा तुमच्याकडे काहीच शिल्लक उरत नाही, तेव्हा तुम्ही धर्माकडे वळता. मी स्वतःला नेहमीच नास्तिक म्हणवतो. कारण, मी मोठा होत असताना हे सगळं जवळून पाहिलं आहे. नैराश्यग्रस्त लोक मंदिरात आश्रयासाठी जातात. त्यांना वाटतं की, एखादं बटण दाबलं तर त्यांच्या सर्व समस्या दूर होतील.’

... तेव्हाच क्रांती होणे शक्य!

अनुराग कश्यप म्हणाला की, ‘आपण आपल्या लढण्याचा मार्ग बदलला पाहिजे. लोकांना त्यांच्या फोनवर तेच ऐकायला मिळते जे त्यांना ऐकायचे असते. आणि ज्यांच्याकडे याचं नियंत्रण आहे, ते आपल्यापेक्षा चार पावले पुढे असतात. त्यांचे तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे, ते खूप स्मार्ट आहेत, त्यांना समज आहे. आपण सगळेच अजूनही भावनिकरित्या मूर्खच आहोत. ज्याप्रकारे स्वदेशीच्या आंदोलनात विदेशी कपडे जाळले गेले होते, त्याचप्रकारे जेव्हा लोक असा फोन फेकून देतील, तेव्हाच क्रांती होणे शक्य आहे’.

WhatsApp channel