Aaliyah Kashyap Mehendi Ceremony Photos : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप लवकरच प्रियकर शेन ग्रेगोयरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. काल या जोडप्याच्या भव्य हळदी सोहळ्याचे फोटो समोर आले. या सोहळ्यात अनुराग कश्यप होणाऱ्या जावयाला मिठी मारताना आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला. इतकंच नाही तर आलिया आणि शेनचा लिप लॉक मोमेंट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर आता वधू-वरांचे मेहंदीचे फोटोही समोर आले आहेत.
काही काळापूर्वी आलिया कश्यपने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून तिच्या मेहेंदीचा फोटो शेअर केला होता. अनुराग कश्यपच्या मुलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून मेहंदी कलाकाराची पोस्ट शेअर केली आहे. जेव्हा, तुम्ही त्या मेहंदी काढणाऱ्या कलाकाराचे सोशल मीडिया पेज उघडाल, तेव्हा तुम्हाला वधू-वरांचे काही फोटो दिसतील. पहिल्या फोटोत आलिया पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे आणि आरामात बसून मेहंदी लावत आहे. तिची मेहेंदी डिझाइन इतकी अनोखी आहे की, तुम्हाला ही चित्रे झूम करून पहावे असे नक्कीच वाटेल.
या वधू-वरांची मेहंदी इतकी वेगळी आहे की, तुम्ही अशी डिझाईन यापूर्वी कधीच पाहिली नसेल. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोइर यांनी त्यांच्या हातावर जी मेहेंदी लावली आहे, त्यात वधू-वर नाहीत, सनई किंवा बँड वाजवणारी लोकं नाहीत. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांनी त्यांच्या लग्नाच्या मेहेंदीचा एक भाग म्हणून त्यांच्या हातावर मांजरी आणि कुत्रे यांचे डिझाईन काढण्यात आले आहे. लग्नाच्या मेहेंदीत तुम्ही अनेक हत्ती पाहिले असतील, पण कुत्रा आणि मांजर? हे कोणी नक्कीच ऐकले किंवा पाहिले नसेल.
आता या जोडप्याने लग्नाच्या मेहंदीत अनोखी डिझाईन का काढली? या मागचे कारण काय आहे? अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपला तिचा पाळीव कुत्रा आणि मांजर खूप आवडते. त्यांचे सोशल मीडिया कॉस्मो आणि काईच्या चित्रे आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. ही तिच्या कुत्र्याची आणि मांजरीची नावे आहेत, ज्यांना ती तिच्या मुलांप्रमाणे वागवते. त्यांच्यावरील प्रेमापोटीच दोघांनी आपल्या हातावर ही मेहंदी काढली आहे.
संबंधित बातम्या