बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल म्हणून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर ओळखले जातात. नेहमी दोघांमधील उत्तम केमिस्ट्री आणि नात्याविषयी चर्चा रंगते. दोघेही खासगी आयुष्यावर फार कमी बोलताना दिसतात. पण अनुपम खेर यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी स्वत:ला मूलबाळ नसण्याची पोकळी जाणवत असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री किरण सोबत लग्न केलेल्या अनुपम यांनी आपल्या सावत्र मुलगा सिकंदर खेरसोबतच्या नात्याशी या सगळ्याचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.
अनुपम खेर यांनी शुभंकर मिश्रा यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अनुपम खेर यांनी स्वत:चे मूल होण्याचा आणि मुलाला मोठे होताना पाहण्याचा संपूर्ण अनुभव गमावल्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, 'मला पूर्वी हे फारसे जाणवले नव्हते, परंतु आता कधीकधी मला असे वाटते. असे नाही, मी सिकंदरवर खूश नाही. परंतु मला वाटते की मूल मोठे होताना पाहणे आनंददायक आहे. मला बाप आणि लेकाचे इतरांचे नाते पाहून आनंद होतो. हे माझे प्रामाणिक उत्तर आहे. याचे उत्तर देणे मी टाळू शकलो असतो, पण मला तसे करायचे नाही. पण, ठीक आहे. मला कधीकधी वाटतं की ही चांगली गोष्ट झाली असती.'
पुढे अनुपम खेर म्हणाले, 'या सगळ्या गोष्टी मी कामात व्यस्त असल्यामुळे झाल्या. मी जेव्हा ५० ते ५५ वर्षांचा झालो तेव्हा मला पोकळी जाणवू लागली. कारण नंतर किरण बिझी झाली आणि सिकंदरही. अनुपम खेर फाऊंडेशन या माझ्या संस्थेतील मुलांसोबत मी काम करतो. आम्ही मुलांबरोबर खूप काम करतो, आणि कधी कधी जेव्हा मी माझ्या मित्रांची मुले आणि अशा गोष्टी पाहतो तेव्हा मला वाईट वाटते की किरण आणि माझे मूल नाही.'
अनुपम यांनी १९८५ मध्ये किरण यांच्याशी लग्न केले. यापूर्वी अनुपम यांनी खुलासा केला होता की, सिकंदर त्यांच्या आयुष्यात आला तेव्हा तो चार वर्षांचा होता. अनेक रिपोर्ट्सनुसार, अनुपम आणि किरण यांनी लग्नानंतर गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. अनुपम यांनी यापूर्वी अभिनेत्री मधुमती कपूरसोबत लग्न केले होते, तर किरण यांनी गौतम बेरीसोबत लग्न केले होते.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ
अनुपम खेर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते 'द सिग्नेचर' या चित्रपटात एका वृद्ध पती अरविंदच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या पत्नीची अंबिकाची भूमिका नीना कुलकर्णी यांनी साकारली होती. अंबिका आजारी पडल्यानंतर लगेचच तिला लाईफ सपोर्टवर ठेवले जाते. त्यानंतर त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तर किरण या राजकीय क्षेत्रातील आपल्या कामात व्यस्त आहेत.
संबंधित बातम्या