Annu Kapoor: मुस्लिमांना चांगले दाखवणे आणि पंडितांना...; अन्नू कपूर यांनी साधला चक दे इंडियावर निशाणा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Annu Kapoor: मुस्लिमांना चांगले दाखवणे आणि पंडितांना...; अन्नू कपूर यांनी साधला चक दे इंडियावर निशाणा

Annu Kapoor: मुस्लिमांना चांगले दाखवणे आणि पंडितांना...; अन्नू कपूर यांनी साधला चक दे इंडियावर निशाणा

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 24, 2024 05:51 PM IST

Annu Kapoor: अन्नू कपूर भारतावर खूप प्रेम करतात पण इथल्या लोकांवर खूप चिडतात. याचे उदाहरण देत त्यांनी चक दे इंडिया या चित्रपटाचा उल्लेख केला आहे.

annu kapoor
annu kapoor

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून अन्नू कपूर ओळखले जातात. त्यांनी आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अन्नू कपूर हे त्यांच्या चित्रपटांसोबतच बिनधास्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखले जातात. पण त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांवर केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी 'चक दे इंडिया' या चित्रपटाचा उल्लेख केला आहे.

लोक मुस्लिमांना चांगले आणि हिंदूंना वाईट दाखवतात

अन्नू कपूर स्वत:ला सच्चा देशभक्त समजतात. ते म्हणतात की आपली मातृभूमी, तिथली जनता आणि तिथली संस्कृती चांगली माहिती आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, ते चित्रपट पाहात नाहीत. भारतात असे फार कमी सिनेमे आहेत जे ओरिजिनल आहेत, बहुतेक चुकीच्या पद्धतीने दाखवतात. शाहरुख खानच्या चक दे इंडिया चित्रपटाबद्दलही ते बोलले. गंगा- यमुना तहजीबच्या नावाखाली लोक मुस्लिमांना चांगले आणि हिंदूंना वाईट दाखवतात.

नेमकं काय म्हणाल्या ?

अन्नू कपूर त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. नुकत्याच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटसृष्टीपासून राजकारण्यांपर्यंत भारतीय जनतेवर टीका केली. ते म्हणाले की, 'भारत किंवा चित्रपटसृष्टी गुणवत्तेनुसार काम करत नाही. गंगा-जमुनी तहजीबच्या नावाखाली जे काही घडले, भारतात जो प्रवास झाला तो दुर्दैवी आहे.' शाहरुखच्या चित्रपटाचे उदाहरणही त्यांनी दिले. चक दे इंडियाचे मुख्य पात्र खरे तर आमचे खूप मोठे प्रशिक्षक श्री नेगी साहेब यांच्या जीवनावर आहे. पण भारताचं काय, मुस्लिमांना चांगलं पात्र म्हणायचे आहे, पंडितांची खिल्ली उडवायची आहे. हा एक असा रोग आहे ज्याला गंगा- यमुनाची पातळी दिली जाते.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

अन्नू कपूर यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने 'चक दे इंडिया चित्रपट. हा चित्रपट प्रशिक्षक रंजन नेगी यांच्या जीवनावर आधारित होता. निर्मात्यांनी पात्राचे नाव बदलून कबीर खान केले. जेव्हा नायकाचा प्रश्न येतो तेव्हा तो मुस्लीम होतो. जेव्हा खलनायकाचा प्रश्न येतो तेव्हा ते त्याला हिंदू बनवतात' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने बॉलिवूडला बॉयकॉट करा असे देखील म्हटले आहे.

Whats_app_banner