Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान

Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 22, 2024 04:51 PM IST

Annu Kapoor: अन्नू कपूर यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी, 'हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते' असे म्हटले आहे. आता अन्नू कपूर असे का म्हणाले चला जाणून घेऊया...

प्रियंका चोपड़ा, अन्नू कपूर
प्रियंका चोपड़ा, अन्नू कपूर

बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते म्हणून अन्नू कपूर ओळखले जातत. अन्नू कपूर हे त्यांच्या भूमिकांसोबत बिनधास्त वक्तव्यामुळे विशेष ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका व्यक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी देशभक्ती, अमेरिकन पत्नी आणि प्रियांका चोप्राशी संबंधित वादावर भाष्य केले आहे. दरम्यान, अन्नू कपूर यांनी 'हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते' असे स्पष्ट वक्तव्य केले आहे.

अन्नू कपूर यांनी नुकताच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'देशभक्ती म्हणजे परफ्यूम नाही की एखाद्या फंक्शनला जायचं असेल, लग्नाला जायचं असेल तर चांगलं शिंपडून यायचं. देशभक्ती म्हणजे आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा २४ तास रक्ताचा प्रवाह' असे म्हटले आहे. आता अन्नू कपूर असे का म्हणाले चला जाणून घेऊया...

अमेरिकन विझासाठी कधीही अर्ज करणार नाही

अन्नू कपूर यांनी मुलाखतीमध्ये अमेरिकन पत्नी अनुपमा पटेल यांच्याबद्दल भाष्य केले. 'माझी पत्नी अमेरिकन नागरिक आहे, पण मी ग्रीन कार्ड आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी कधीही अर्ज केलेला नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य, मराणापर्यंत कधीही तिथल्या विझासाठी अर्ज करणार नाही. माझ्याकडे पर्याय नाही. मी माझ्या देशाची एकनिष्ठ आहे' असे अन्नू कपूर म्हणाले.

२०११मधील वादावर वक्तव्य

या मुलाखतीच्या शेवटी अन्नू कपूर यांनी २०११मध्ये प्रियांका चोप्रासोबत दिलेल्या किसिंग सीनवर भाष्य केले खरं तर २०११ साली '७ खून माफ' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात अन्नू कपूरने प्रियांकाच्या सात पतींपैकी एकाची भूमिका साकारली होती. जेव्हा या चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले तेव्हा अन्नू कपूर यांनी वादग्रस्त विधान केले होते. 'प्रियांका माझ्यासोबत इंटिमेट सीन करायला तयार नव्हती कारण मी दिसायला चांगला नाही. जर मी देखणा असतो तर तिने नकार दिला नसता. प्रियांकाने इतर कलाकारांसोबत अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. हिरोला किस करायला कुठल्याही हिरोईनला हरकत नसते' असे अन्नू कपूर म्हणाले.
वाचा: आपण सर्वजण आई-वडिलांच्या सेक्सचा...; कंडोमच्या जाहिरातींची खिल्ली उडवणाऱ्यांना अन्नू कपूरचं उत्तर

तब्बल १३ वर्षांनी अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा या वादावर वक्तव्य केले. अन्नू कपूर म्हणाले, 'प्रियांका चोप्राने अन्नू कपूरला किस करण्यास नकार दिल्याची बातमी आली होती. प्रियांका चोप्राला मी देखणा हिरो असतो तर तर हरकत नसती. हिरोला किस करायला कुठल्याही हिरोईनला हरकत नसते. ना माझा चेहरा देखणा आहे ना माझे व्यक्तीमत्त्व आकर्षीत आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली.'

Whats_app_banner