बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून अन्नू कपूर ओळखले जातात. त्यांनी आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अन्नू कपूर हे त्यांच्या चित्रपटांसोबतच बिनधास्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर अन्नू कपूर यांनी कंडोमच्या जाहिरातीवर केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अन्नू कपूर यांच्या ताज्या कंडोम जाहिरातीची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. यावर बहुतांश लोक मजेशीर कमेंट्स करत असून आता मीम्सही बनवायला सुरुवात झाली आहे. ते पाहून अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यासाठी निर्मात्यांनी अन्नू कपूर यांची निवड केली. ही जाहिरात तरुण पिढीचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच जाहिरातीमध्ये सेक्सचे महत्त्व पटवून दिले आहे.
अन्नू कपूर जाहिरातीमध्ये एका जवळच्या मित्राशी गप्पा मारत असतात. नंतर ट्विस्ट येतो आणि ते कंडोमविषयी बोलताना दिसतात. या जाहिरातीवर अनेक मीम्स बनवले जात आहेत. अचानक आलेल्या ट्विस्टमुळे लोकही हैराण झाले आहेत. आता न्यूज १८ शी बोलताना अन्नू कपूर यांनी लोकांच्या प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया दिली. अन्नू म्हणाले, ‘मी ऐकले आहे की इंटरनेटवर प्रतिक्रिया येत आहेत. योगायोगाने मी वृत्तवाहिन्या पाहत नाही किंवा वर्तमानपत्रे वाचत नाही. त्यामुळे मला माझ्या ऑफिसमधल्या लोकांकडून याची माहिती मिळाली. लोक त्याकडे गांभीर्याने पण सकारात्मकतेने पाहत आहेत. निर्मात्यांना हेच हवे होते आणि त्यांना ते मिळाले.’
'मी तरुणांना लेक्चर देत नाही. मी त्यांना प्रेरक भाषणे किंवा ज्ञान देणारा नाही. सेक्स किंवा हिंसेशी संबंधित प्रत्येक गोष्ट लोकांना आकर्षित करते' असे अन्नू कपूर म्हणाले. जाहिरातीमध्ये ते जणूकाही आजोबांशी बोलताना दिसत आहे. आजोबा मुलांना काहीतरी समजावून सांगत आहेत. अन्नू पुढे म्हणाले, 'हा म्हातारा तरुणांना खबरदारी घेण्यास आणि सावध राहण्यास सांगत आहे. काही माझ्या नातवंडांच्या वयाची असू शकतात. वयाच्या ७० व्या वर्षी मी आणखी काय करू शकतो. मी फक्त सेक्स करताना काळजी घेण्याचे आवाहन देऊ शकतो.'
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ
अन्नू कपूर पुढे म्हणाले, 'सेक्स हा मानवी जीवनातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा पैलू आहे. याला स्टँडअप कॉमेडीचा विषय मानता कामा नये. आपण सर्व आपल्या आई-वडिलांच्या सेक्सचा परिणाम आहोत. सेक्स ही देवाने दिलेली अनोखी देणगी आहे. त्यामुळे आपण ते हलक्यात घेऊन त्याची खिल्ली उडवू शकत नाही. हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. '
संबंधित बातम्या