Annu Kapoor : बायको अमेरिकन पण नाईलाजास्तव मी देशभक्त, अन्नू कपूर यांच्या वक्तव्याने पुन्हा गदारोळ!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Annu Kapoor : बायको अमेरिकन पण नाईलाजास्तव मी देशभक्त, अन्नू कपूर यांच्या वक्तव्याने पुन्हा गदारोळ!

Annu Kapoor : बायको अमेरिकन पण नाईलाजास्तव मी देशभक्त, अन्नू कपूर यांच्या वक्तव्याने पुन्हा गदारोळ!

Nov 12, 2024 08:54 AM IST

Annu Kapoor On Nationality : अन्नू कपूर म्हणाले की, ‘हा देश मला नाल्यात किंवा खड्ड्यात फेकू दे, मला गोळ्या घालू दे, किंवा मला काहीही देऊ दे, पण माझी मजबुरी आहे की, मी माझ्या देशाशी एकनिष्ठ आहे.'

Annu Kapoor
Annu Kapoor (HT)

Annu Kapoor On Nationality : भारतीय अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि रेडिओ जॉकीपासून ते टीव्ही होस्टपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तज्ज्ञ असणारे अन्नू कपूर त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे खूप चर्चेत आहेत. नुकतेच, अन्नू कपूर यांनी अमेरिकन नागरिकत्वापासून ते गीता आणि इस्लामपर्यंत अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मुलाखतीत देशभक्तीची तुलना परफ्युमशी केली आहे.

अन्नू कपूर यांनी त्यांच्या आयुष्यात तीन वेळा लग्न केले आहे. १९९२मध्ये त्यांनी अमेरिकन वंशाच्या अनुपमाशी लग्न केले. मात्र, ते एका वर्षातच मोडले. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले आणि हे नाते जवळपास १० वर्षे टिकले. यानंतर त्याच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाचा प्रवेश झाला. २००८मध्ये त्यांनी पुन्हा पहिल्या पत्नीशी लग्न केले आणि दोघांनाही मुले आहेत. अमेरिकन पत्नी आणि मुले असूनही अन्नू कपूर यांनी कधीही अमेरिकन नागरिकत्वाचा विचार केला नाही.

परदेशात स्थायिक होण्याचा विचार अन्नू यांनी कधीच केला नाही. एएनआयशी बोलताना अन्नू कपूर म्हणाले की, मी कधीही अमेरिकेचे नागरिकत्व घेण्याचा विचार केला नव्हता. याबाबत त्यांनी पत्नी व मुलांवर कोणताही दबाव टाकला नाही. देशभक्तीबद्दल बोलताना अभिनेते म्हणाले की, लोकांची देशभक्ती १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच जागृत होते. याशिवाय क्रिकेटच्या मैदानात झेंडा फडकवताना लोकांना देशभक्ती आठवते.

Annu Kapoor: हिरोला किस करायला कोणतीही हिरोईन तयार असते; अन्नू कपूरचं वादग्रस्त विधान

देशभक्ती हा परफ्यूम नाही!

अन्नू कपूर म्हणाले, ‘देशभक्ती हा परफ्यूम नाही की एखाद्या फंक्शनला जायचं असेल, लग्नाला जायचं असेल तर चांगला परफ्यूम लावावा. देशभक्ती म्हणजे तुमच्या शरीरात २४ तास वाहणारा रक्ताचा प्रवाह. मी लोकांना सांगू इच्छितो की, जर तुमची देशभक्ती वेळ आणि संधीवर अवलंबून असेल तर ती देशभक्ती नाही.' त्यांनी आपली देशावरील निष्ठा व्यक्त करताना म्हटले की, 'माझी पत्नी अमेरिकन आहे आणि मी कधीही अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही. मी आयुष्यभर इथे मरेन, पण तिथलं नागरिकत्व घेणार नाही. माझी मजबुरी आहे की, मी खूप निष्ठावान प्रकारचा व्यक्ती आहे. हा देश मला नाल्यात किंवा खड्ड्यात फेकू दे, मला गोळ्या घालू दे, किंवा मला काहीही देऊ दे, पण माझी मजबुरी आहे की, मी माझ्या देशाशी एकनिष्ठ आहे.'

गीता शिकवते जीवनाचा अर्थ

अन्नू कपूर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत श्रीमद भागवत गीतेबद्दलही बरेच काही सांगितले होते. ते म्हणाले होते, 'गीता एक अप्रतिम ग्रंथ आहे, मी नास्तिक असूनही मला वाटतं की, जे काही शिकता येते ते गीतेतून शिकता येते.' उदाहरण देताना ते म्हणाले की, ‘आपला देश चारही बाजूंनी शत्रूंनी घेरला आहे. आपण खूप मवाळ आहोत, म्हणून सगळ्यांनी आपली फसवणूक केली. श्रीकृष्ण आणि शिशुपाल यांच्या कथेची आठवण सांगताना म्हटले की, ९९ वेळा चूक ठीक होती, परंतु १००व्या वेळी तुम्हाला सुदर्शन चालवावे लागेल.’ 

Whats_app_banner