मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankush Chaudhari: मराठीत अनोखा प्रयोग! अंकुश चौधरी दिसणार 'महादेव'च्या रुपात

Ankush Chaudhari: मराठीत अनोखा प्रयोग! अंकुश चौधरी दिसणार 'महादेव'च्या रुपात

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 09, 2024 09:23 AM IST

Ankush Chaudhari Upcoming Movie: अभिनेता अंकुश चौधरीच्या 'महादेव' या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Ankush Chaudhari
Ankush Chaudhari

Ankush Chaudhari Mahadev Movie Poster: सध्या मराठी चित्रपटसृष्टीला सुगिला दिवस आल्याचे पाहायला मिळते. अनेक मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांना टक्कर देताना दिसतात. बॉक्स ऑफिसवर देखील हे चित्रपट चांगली कमाई करत आहेत. वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. आता आणखी एक असाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'महादेव' असे असून अभिनेता अंकूश चौधरी यात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

'महादेव' या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमध्ये अंकुश चौधरीच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध दिसत असून यात महादेवाचे कोणते रूप पाहायला मिळणार आहे, हे येत्या काळात कळेल. पण हे पहिलेवहिले मोशन पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: अभिनेत्याची विंटेज कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत केली परत करण्याची मागणी

महाशिवरात्रीचे औचित्य साधत स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित 'महादेव' चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. महादेवाच्या मंदिरात या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी 'महादेव'मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अंकुश चौधरी, दिग्दर्शक तेजस लोखंडे, संगीतकार अमितराज, पंकज पडघन, निर्माते जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते. संदीप दंडवते लिखित या चित्रपटाचे संदीप बाबुराव काळे, अमेय संदेश नवलकर (शुभारंभ मोशन पिक्चर्स) सहनिर्माते आहेत.
वाचा: 'चला हवा येऊ द्या'घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी असणार शेवटचा एपिसोड?

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणतात, "आजच्या शुभदिनी आम्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून अंकुशसारखा अष्टपैलू अभिनेता यात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारणार आहे. सध्या तरी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. परंतु 'महादेव'मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे."

IPL_Entry_Point

विभाग