Ankita Prabhu Walawalkar: अखेर अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आला समोर, कोण आहे होणारा नवरा?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankita Prabhu Walawalkar: अखेर अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आला समोर, कोण आहे होणारा नवरा?

Ankita Prabhu Walawalkar: अखेर अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आला समोर, कोण आहे होणारा नवरा?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 12, 2024 12:48 PM IST

Ankita Prabhu Walawalkar: इन्फ्लूएंजर अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठीच्या घरात गेल्यापासूनच चर्चेत होती. आता तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Ankita Prabhu Walawalkar
Ankita Prabhu Walawalkar

बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली इन्फ्लूएंसर म्हणजे अंकिता वालावलकर. घरात गेल्या पासून अंकिताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अंकिताने अनेकदा तिचे लग्न जमल्याची माहिती दिली. पण ती कुणाशी लग्न करतेय याविषयी माहिती तिने दिली नव्हती. आता अंकिताने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे. चला जाणून घेऊया अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडविषयी...

कोण आहे अंकिताचा बॉयफ्रेंड?

अंकिताच्या बॉयफ्रेंडविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. याआधी अंकिताचं नाव महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने याचसोबत जोडलं गेलं. मात्र दोघांनीही तसलं काही नसल्याचा खुलासा केला. आता खुद्द अंकितानेच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. अंकिताच्या बॉयफ्रेंडचे नाव कुणाल भगत आहे. कुणाल हा एक संगीत दिग्दर्शक असून मराठी संगतीसृष्टीतीलं लोकप्रिय जोडी करण कुणाल जोडी पैकी एक आहे.. या जोडगोळीने पांडू,अथांग, नवरदेव आणि आता येऊ घातलेल्या येक नंबर यासारख्या चित्रपट आणि मालिकांना संगीत दिल आहे.

अंकिताने शेअर केला खास फोटो

बिग बॉस मराठी फेम अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही पिवळ्या रंगाच्या शेडमध्ये कपडे परिधान केले आहेत. अंकिताने पिवळ्या रंगाचा टॉप आणि क्रॉप हुडी घातले आहे. त्यावर निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर कुणालने पिवळ्या रंगाचा हुडी घातला आहे आणि निळ्या रंगाची जीन्स. दोघांचा हा रोमँटिक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अंकिताने हा फोटो शेअर करत, 'सूर जुळले' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

अंकिता आणि कुणालची भेट कशी झाली?

अंकिता आणि कुणाल यांची भेट एका म्युसिक अल्बमच्या वेळी झाली होती. अंकिताने काम केलेल्या आनंदवारी' या अल्बम सॉन्गला कुणाल - करण या जोडीने संगीत दिले आहे. अंकिताच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दरम्यान अंकिता आणि कुणालच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांंनी दोघांचे अभिनंदन केले आहे. आता त्यांच्या लग्नाची सर्वजण वाट पाहात आहेत.

Whats_app_banner