Ankita Lokhande Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे चर्चेत आले होते. या दरम्यान, अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे मीडियावर भडकताना दिसली आहे. यावरून अंकिता आता चांगलीच ट्रोल होत आहे.
नुकताच अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री रागाने लालबुंद होऊन पॅप्सवर जोरात ओरडताना दिसत आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अंकिता मीडियाशी अत्यंत रागाने बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पापाराझींवर ओरडत अंकिता म्हणते की, ‘आत फिल्म चालू आहे, चला आधी बाहेर व्हा... बाहेर व्हा... हे बरोबर नाही… यार, हे खरंच अति झालं नाही का? आत फिल्म चालू आहे, जरा धीर धरा मित्रांनो, काय सुरू आहे हे?’ यानंतर अंकिता आत जाते. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया देत, अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.
अंकिता लोखंडे हिच्या या व्हिडीओ आता चाहते आणि नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘हिला स्वतःलाच काही शिस्त नाही.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘काय अभिनय करते आहे.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘अंकिता इतके रागावणे आरोग्यासाठी चांगले नाही.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘ओव्हरॲक्टिंगची दुकान पुन्हा नाटक करत आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘जया बच्चन इन मेकिंग.’ आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘जेव्हापासून ती बिग बॉस १७मधून बाहेर पडली आहे, तेव्हापासून ती एखाद्या अँग्रीबर्ड बनून फिरत आहे.’ आता अंकिताच्या या व्हिडीओवर युजर्स अशाच प्रकारच्या कमेंट करत आहेत.
अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा यांचा 'वीर सावरकर' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहत्यांना आधीपासूनच उत्सुकता होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. ‘शैतान’, ‘योद्धा’ आणि ‘बस्तर: नक्षल स्टोरी’ हे चित्रपट आधीपासूनच तिकीट खिडकीवर आपलं स्थान टिकवून आहे. अशा परिस्थितीत ‘वीर सावरकर’ चित्रपटाला कमाई करणे अजिबात सोपे असणार नाही.