मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: अंकिता लोखंडेचा बेडरूम व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल! नेटकरी करतायत ट्रोल

Viral Video: अंकिता लोखंडेचा बेडरूम व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल! नेटकरी करतायत ट्रोल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2024 09:23 AM IST

Ankita Lokhande Bedroom Video leak: अंकिता लोखंडेचा हा बेडरूम व्हिडीओ समोर येताच आत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Ankita Lokhande Vicky Jain Bedroom Video
Ankita Lokhande Vicky Jain Bedroom Video

Ankita Lokhande Bedroom Video leak:बिग बॉस १७’ संपल्यानंतर देखील अंकिता लोखंडे आणि विकी जैन सतत प्रकाशझोतात आहेत. आता या जोडप्याचा बेडरूमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकी जैन अंकिता लोखंडेसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसला आहे. या व्हिडीओमध्ये विकी जैन झोपलेला असून अंकिताने त्याचा व्हिडीओ शूट केल्याचे दिसत आहे. याआधी दोघांचा असाच बाथरूममधून एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये दोघेही बाथरोबमध्ये दिसले होते. तर, त्यांच्या बाथटबला गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवले होते. त्यांच्या या दोन्ही व्हिडीओंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ समोर येताच आत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, ‘ही काय वेडी बाई आहे का?’ दुसऱ्याने लिहिले, ‘बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ड्रामा सुरू केला.’ आणखी एका यूजरने लिहिले के, ‘अंकिता लोखंडे म्हणजे मेकअपचं दुकान’. एका यूजर लिहिले की, ‘ताई आम्हाला जे पहायचे होते ते आम्ही पाहिले.’ अनेकांनी विक्कीबद्दल विविध प्रकारच्या कमेंट्सही करायला सुरुवात केली आहे. एकाने लिहिले, ‘विकी भैया असे व्हिडीओ लीक करू नका, आधीच तुमचे नाते लीक झाले आहे.’ सध्या दोघांच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स सुरू आहेत.

Rahul Roy Birthday: रातोरात सुपरस्टार झाला; एकापाठोपाठ ४७ चित्रपटही मिळाले! आता काय करतो ‘आशिकी’ फेम राहुल रॉय?

अंकिता आणि विकीचा हा व्हिडीओ गोव्यातील असून, ही जोडी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गेली आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा बिग बॉसमधला प्रवास खूप आव्हानात्मक होता. बिग बॉसमधील त्यांच्या प्रवासात बरेच चढ-उतार आले होते. या शोमध्ये दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. अशा परिस्थितीत शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होतील, अशी अटकळ बांधली जात होती. या शोमध्ये विकीची मन्नारा चोप्रासोबत चांगली केमिस्ट्री जुळली होती, जे पाहून अंकिता असुरक्षित व्हायची. मात्र, विकी मन्नाराला एक चांगली मैत्रीण मानतो.

या वादादरम्यान अंकिताने विकीला शोमध्ये धमकी देताना म्हटले होते की, ती घटस्फोट घेईल. या शोमधून बाहेर पडल्यानंतरही दोघांच्या अनेक मुलाखती समोर आल्या आहेत, ज्यामध्ये विकी आणि अंकिता यांना त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र, या प्रश्नांना प्रत्युत्तरात देताना दोघांनी अनेकदा स्पष्ट केले की, त्यांच्यात सर्व काही ठीक चालले आहे. अंकिताला देखील घटस्फोटाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ती म्हणाली की, ‘मी माझ्या लग्नाच्या नात्यात कधीही रिस्क घेणार नाही, मी तशी मुलगी नाही. आम्ही दोघे एका रिॲलिटी शोमध्ये आलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही दोघे घटस्फोट घेऊ. सध्या दोघेही वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.’

WhatsApp channel

विभाग