Bigg Boss 17: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं नेमकं जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं नेमकं जाणून घ्या

Bigg Boss 17: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं नेमकं जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 22, 2023 03:21 PM IST

Ankita Lokhande Bigg Boss 17: बिग बॉस १७च्या नुकताच पार पडलेल्या भागात अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली आहे. नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...

Bigg Boss 17
Bigg Boss 17

सध्या 'बिग बॉस १७' हा रिअॅलिटी शो चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेली स्पर्धक अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे सतत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. आतापर्यंत गोडीगुलाबीने एकत्र राहून चाहत्यांची मने जिंकणारे हे जोडपे बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहे. दोघांची आतापर्यंत अनेकदा कडाक्याची भांडणे झाली आहेत. नुकताच पार पडलेल्या एपिसोडमध्ये तर अंकिताने विकीच्या चक्क चप्पल फेकून मारली आहे.

अंकिताने विकीला सर्वांसमोर खोटे बोलताना पकडले आहे. विकीने त्याचे जेवण ईशा मालविय आणि मुनव्वर दिल्याचे समोर आले. ‘दिल का घर’मध्ये राहणारी ईशा मुनव्वरला म्हणाली की ‘दम का घर’मधील खानजादीने ‘दिमाग का घर’मधील सदस्यांनी बनवलेले अन्न खाल्ले होते. मात्र, विकी आणि खानजादी ईशाचा दावा फेटाळतात. याचदरम्यान अंकिता लोखंडे तिथे पोहोचते.
वाचा: बिग बॉसच्या घरात सेक्स करतात?; स्पर्धकाने सांगितले सत्य

अंकिताला पूर्ण प्रकरण कळाल्यानंतर तिने खुलासा केला की तिने खानजादीला दिमाग का घरमधील सदस्यांचे जेवण खाताना पाहिलं होतं. यानंतर विकी मस्करी करत अंकिताची मान मागून पकडून तिला ओढतो. अंकिताने विकीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता विकीने तिला मागून पकडून तिचा हात धरला. या मस्करीदरम्यान अंकिता विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली, पण तो न थांबल्याने अंकिताने तिची चप्पल काढली आणि गमतीत विकीला मारली. त्यामुळे सोशल मीडियावर अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली असे म्हटले जात आहे.

याच भागात विकीने सनाचा हात पकडला होता. त्यामुळे सोशल मीडियावर विकीला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी विकीला पत्नीकडे लक्ष दे असे म्हटले आहे.

Whats_app_banner