Bigg Boss 17: विकीशी लग्न करुन अंकिता लोखंडेला होतोय पश्चाताप ? सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: विकीशी लग्न करुन अंकिता लोखंडेला होतोय पश्चाताप ? सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

Bigg Boss 17: विकीशी लग्न करुन अंकिता लोखंडेला होतोय पश्चाताप ? सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Nov 15, 2023 05:10 PM IST

Ankita Lokhande talked About Marriage: विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये टोकाचे भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंकिता असे बोलताना दिसत आहे.

Ankita Lokhande
Ankita Lokhande

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. यंदाचे बिग बॉसचे १७वे सिझन सर्वांचे लक्ष वेधून दिसते. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे तर सतत वादग्रस्त विधान करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा पती विकी जैनसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नविषयी बोलताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिताच्या नात्यात फूट पडताना दिसत आहे. विकी बिग बॉसच्या घरात येऊन आनंदी दिसत आहे. तर दुसरीकडे अंकिता ही खासगी आयुष्य आणि घरातील खेळ या दोघांमध्येही गोंधळ घालताना दिसत आहे. नुकताच त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. भांडण सुरु असताना विकी अंकिता जवळ जातो तेवढ्यात अंकिता त्याला धक्का देते. ती विकीवर ओरडते त्याला चांगलच सुनावते. त्याने तिचा नेहमीच कसा वापर केला हे देखील पुढे ती बोलते. त्यानंतर ती म्हणते 'मला असे वाटते मी चुकीच्या माणसाशी लग्न केले आहे बिग बॉस.' त्यामुळे बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिताच्या नात्यात दुरावा निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
वाचा: हृतिक रोशन लवकरच अडणार विवाहबंधनात? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

त्यानंतर विकी आणि अंकिता बिग बॉसच्या घरातील एका सोफ्यावर बोलताना दिसत आहेत. विकी अंकिताला समजावताना दिसत आहे. तो अंकिताला म्हणतो ही खड्ड्यात गेले ४ कोटी रुपये चल आपण घरी जाऊया. तू मला जराही समजावून घेत नाहीस. त्यानंतर दोघांमध्ये पॅचअप होताना दिसत आहे.

Whats_app_banner