मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिता झाली भावूक, मानले सलमानचे आभार

Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिता झाली भावूक, मानले सलमानचे आभार

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 31, 2024 11:52 AM IST

Ankita Lokhande Social Media: अंकिता लोखंडे ही 'बिग बॉस १७'मध्ये दिसली होती. बिग बॉसच्या घरातून बाहरे पडताच अंकिताने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Ankita Lokhande First Post After Bigg Boss 17
Ankita Lokhande First Post After Bigg Boss 17

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या 'बिग बॉस १७'चा (Bigg Boss 17) विजेता नुकताच घोषीत झाला. रॅपर मुनव्वर फारुकीने बिग बॉसचा ताज स्वत:च्या नावे केला. यंदा विजेते पदासाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) विशेष चर्चा रंगली होती. मात्र ती अपयशी ठरली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, "एक प्रवास पवित्र रिश्तापासून सुरु झाला होता. आता हा प्रवास आणखी जास्त आठवणीत राहणारा झाला आहे. त्याला कारण आहे, ‘रिश्तो वाली लडकी’ला तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे… माझे हरणे किंवा जिंकणे तितके महत्वाचे नाही. जितके तुमचे माझ्यावरचे प्रेम आणि विश्वास आहे. तुमच्या प्रेमानेत मला इथपर्यंत पोहोचवले आहे."
वाचा: 'माझ्या भावानं जर माझं ऐकलं असतं तर....', अरबाजच्या लग्नावर सलमानची प्रतिक्रिया

मानले चाहत्यांचे आभार

पुढे ती म्हणाली, अर्थातच चढ-उतार येत होते… थोडे निघून गेले. थोडे थांबले. पण या सगळ्यात तुम्ही लोक माझ्या पाठीशी उभे राहिलात! मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्व #AnkuHolics, आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद हा शब्द अगदी लहान आहे. पण तुमच्यासाठी एक Virtual झप्पी!

ट्रेंडिंग न्यूज

अंकिताने मानले सलमानचे आभार

"तुम्ही माझ्यासोबत जे बोललात त्यामुळे मी टिकून राहिले. गोड शब्दांसाठी सलमान सर यांचे विशेष आभार" अस अंकिता म्हणाली. ही पोस्ट खास सगळ्या चाहत्यांसाठी आहे. तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मी तुमचे आभार मानते. मनापासून धन्यवाद, असे म्हणत अंकिताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी

'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. मुनव्वर फारुकीने अभिनय क्षेत्रात करिअर केले आहे. त्यासोबतच तो स्टँडअप कॉमेडीयन आणि उत्तम रॅपर म्हणून देखील ओळखला जातो. तो पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होता.

WhatsApp channel