Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 14, 2025 11:04 AM IST

Rozlyn Khan on Ankita Lokhande: अंकिता लोखंडेविरुद्धच्या खटल्याशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रे रोजलिन खानने इन्स्टाग्रामवर शेअर केली आणि कायदेशीर कार्यवाहीची माहिती दिली.

अंकिता लोखंडेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा
अंकिता लोखंडेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? वाचा

Ankita Lokhande in Legal Trouble: अभिनेत्री रोझलिन खानने अंकिता लोखंडेविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. एका मुलाखतीदरम्यान रोझलिनने हिना खानच्या कॅन्सरला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते. या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करत अंकिता लोखंडेने रोझलिनला 'चीप' असे म्हटले. इतकेच नाही तर, तिचा नवरा आणि उद्योगपती विकी जैन हिनाला भेटायला गेला तेव्हा काय घडले? हेही तिने सांगितले.

कारण काय?

रोझलिनने हा खटला दाखल करण्यामागचे कारण स्पष्ट करत इन्स्टाग्रामवर कागदपत्रे शेअर केली. 'हिना खानची १५ तासांची शस्त्रक्रिया आणि तिच्या उपचारात येणाऱ्या अडचणींवर मी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. हिनाने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. रूग्णाची गुप्तता पाळून रुग्णालयही गप्प बसले. परंतु, आता मला अनोळखी लोकांच्या धमक्या येत आहेत. माझ्या पेजवर घाणेरड्या कमेंट्स करण्यासाठी अनेक बॉट्स सेट केले जात आहेत. फॅन पेज मला ट्रोल करण्यासाठी माझे व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यामुळे मला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे रोझलिनने पोस्ट केले आहे.

रोझलिनला भलताच संशय

रोझलिनपुढे म्हणाली आहे, 'अंकिता लोखंडेने रिअ‍ॅलिटी चेक करण्याऐवजी माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आश्चर्याची बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियानंतर हिना खानला सांगता येत नाही की तिच्यावर कोणती शस्त्रक्रिया केली जात आहे? ज्यासाठी १५ तास लागतात. केमोथेरपी आणि सुपर मेजर शस्त्रक्रियेनंतर ती स्कूबा डायव्हिंग, स्नो स्लाइडिंग आणि इतर स्टंट शूट कसे करत आहे?

अंकिता लोखंडे काय म्हणाली?

हिना खानबाबत संशय व्यक्त करणाऱ्या रोझलिनबाबत बोलताना अंकिता म्हणाली की, ‘कोणी इतके खालच्या स्तरावर जाऊ शकते? हे किती चीप आहे. हिना खान अतिशय धाडसाने कॅन्सरशी लढत आहे. मी हे इतक्या आत्मविश्वासाने सांगू शकले, कारण मला हे माहित आहे. काही दिवसांपूर्वी विक्की हिनाला हॉस्पिटलमध्ये भेटला गेला होता. त्यावेळी तिच्यावर केमोथेरपी सुरू होती. विक्कीने मला सांगितले की, जेव्हा त्याने हिनाची अवस्था पाहिली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हिना, तू खूप बलवान आहेस, आमची वाघीन! देव तुला लवकरात लवकर बरा करो.'

हिना सध्या स्टेज-३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. हिना सोशल मीडियावर तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल मोकळेपणाने बोलत असते, अनेकदा रुग्णालयात तिच्या उपचारांची झलक शेअर करत असते. रोझलिनच्या आरोपांवर तिने अद्याप उत्तर दिलेले नाही.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner