मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankita Lokhande: ‘माझ्यासाठी हार-जीत फार महत्त्वाची नव्हती, पण...’; बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट!

Ankita Lokhande: ‘माझ्यासाठी हार-जीत फार महत्त्वाची नव्हती, पण...’; बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 30, 2024 03:19 PM IST

Ankita Lokhande First Post After Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’ हा शो संपल्यानंतर आता अंकिता लोखंडे हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे.

Ankita Lokhande First Post After Bigg Boss 17
Ankita Lokhande First Post After Bigg Boss 17

Ankita Lokhande First Post After Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरच्या ‘बिग बॉस १७’ या सगळ्यात गाजलेल्या टीव्ही शोने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा देखील समावेश होता. यावेळी अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’चं विजेतेपद जिंकेल असं वाटत होतं. मात्र, तिची ही संधी थोडक्यात हुकली आहे. यामुळे तिचा चाहत्यांची निराशा झाली. मात्र, आता ‘बिग बॉस १७’ संपल्यानंतर आता अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

‘बिग बॉस १७’ हा शो संपल्यानंतर आता अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अंकिता लोखंडे हिने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘पवित्र रिश्तापासून सुरू झालेला प्रवास आता ‘नाती सांभाळणारी मुलगी’ या ओळखीने आणखी अविस्मरणीय झाला आहे! तुमच्या पाठिंब्याने आणि तुमच्या प्रेमाने मला इथपर्यंत आणले आहे. आणि म्हणूनच मला माझ्या विजय-पराजयाने काही फरक पडत नाही. या प्रवासात नक्कीच चढ-उतार होते... काही पाठीशी उभे राहिले, काही नाही राहिले, पण तुम्ही लोक नेहमीच माझ्यासोबत होतात! मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.’

Jaya Bachchan: ‘लग्नानंतर सगळा रोमान्स संपून जातो’; नातीच्या शोमध्ये जया बच्चन हे काय बोलून गेल्या?

अंकिताने शेअर केला खास व्हिडीओ!

या पोस्टमध्ये अंकिता लोखंडे हिने एंडमॉल, कलर्स चॅनल, जिओ सिनेमा आणि सलमान खान यांचे विशेष आभार मानले आहेत. या पोस्टसोबत अंकिता लोखंडे हिने एक व्हिडीओ देखील शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे हिच्या आजवरच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओची सुरुवात 'पवित्र रिश्ता'मधील काही सीनने होते. यानंतर अंकिता तिचा पती विकी जैनसोबत 'बिग बॉस १७' मध्ये परफॉर्म करताना दाखवण्यात आली आहे.

यासोबत व्हिडीओमध्ये लिहिले आहे की, 'वन मॅन आर्मी, जिने या शोवर आणि आमच्या हृदयांवर राज्य केले. 'बिग बॉस १७’ हा 'द अंकिता लोखंडे शो' (Ankita Lokhande) म्हणून लक्षात राहील.’ इतकं सगळं कौतुक झालं असलं तरी, अंकिता लोखंडे हिला या शोच्या टॉप ३मध्ये देखील स्थान मिळवता आलं नाही. अंकिता लोखंडे या महाअंतिम स्पर्धेतून फार लवकर बाहेर पडली.

WhatsApp channel

विभाग