बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?-ankita lokhande apologised for a women who come to collect bappa ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?

बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 07, 2024 02:52 PM IST

Ankita Lokhande: बिग बॉस १७ फेम आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. यावर्षी देखील ती बाप्पाची मूर्ती आणायला गेली होती. बाप्पाची मूर्ती आणली, पण तिथे असं काही घडलं की अंकिताला माफी मागावी लागली.

Ankita Lokhande
Ankita Lokhande

Ankita Lokhande apologised: दरवर्षी प्रत्येकजण गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वसामान्य असो वा दिग्गज, प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार बाप्पाची पूजा करतो. कलाकारही पूर्ण भक्तीभावाने त्याची पूजा करतात. स्टार्सही गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करतात. बिग बॉस 17 फेम आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. यावेळीही तिने बाप्पाची मूर्ती आणली, पण तिथे असं काही घडलं की तिला एका महिलेची माफी मागावी लागली आहे. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंकिताने महिलेची माफी का मागितली?

अंकिता लोखंडे शुक्रवारी गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी गेली होती. अंकिताला पाहताच तिथे पॅपराझींची गर्दी जमली. एक तर मूर्ती विकत घेणाऱ्यांची आधीच गर्दी झाली होती, त्यात अंकिताला पाहून पॅपराझीही आले. हे पाहून तिथे उपस्थित असलेली एक महिला पॅपराझींवर संतापली आणि जोरजोरात ओरडू लागली. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून अंकिताने महिलेला थांबवून तिची माफी मागितली. अंकिताचा हा माफी मागतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अंकिताच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने गडद लाल रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. तसेच अंकिता नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. अंकिता लोखंडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांना मजेशीर कमेंट्स येत आहेत. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'गणपती आगमनादरम्यान अंकिताने मनापासून माफी मागितली. आणखी एका युजरने लिहिलं, 'मोठी गोष्ट अंकिताने माफी मागितली, पण ऐकून बरं वाटलं. एकाने मजेशीर पद्धतीने लिहिलं, 'सिंघम आंटी. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.
वाचा: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?

अंकिताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या कॉमेडियन भारती सिंहच्या 'लाफ्टर शेफ' या कार्यक्रमात दिसत आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत तिचा पती विक्की जैन आणि अर्जुन बिजलानी, अली गोणी, करण कुंद्रा, राहुल वैद्य, कश्मीरा शाह, कृष्णा अभिषेक, निया शर्मा दिसत आहेत. या शोमध्ये अंकिता मजामस्ती करताना दिसत आहे.

 

Whats_app_banner
विभाग