छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत असलेल्या प्रेम संबंधांमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक वर्षे एकटी राहिल्यानंतर अंकिता उद्योजक विकी जैनला डेट करु लागली. काही वर्षे डेट केल्यानंतर अंकिता विवाहबंधनात अडकली. आता अंकिता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे.
अंकिता आणि विकी जैन एकमेकांना डेट करत असताना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी विभक्त होण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण भावनेच्या भरात दोन्हीही कुटुंबीयांचा विरोध पत्कारुन अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकले. आता सोशल मीडियावर अंकिताचे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती विकीशी लग्न करताना दिसत आहे.
वाचा: फायटर ते ऐ वतन मेरे वतन; 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अंकिताने लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. तर विकीने चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि पँट परिधान केली आहे. दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहेत. तसेच समोर असलेल्या अग्निला साक्षी मानून दोघेही लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. विकी आणि अंकिताचे पुन्हा लग्न करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांना धक्का बसला आहे. ते दोघे पुन्हा लग्नबंधनात का अडकले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या फोटोवर अंकिता किंवा विकीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलेत का? मराठीसह हिंदी मालिकांमध्ये करते काम
अंकिता आणि विकीने १४ डिसेंबर २०२१मध्ये पहिल्यांदा विवाह केला होता. जवळपास ५ ते ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. २०२१मध्ये लग्न करताना अंकिता आणि विकीने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. त्यांच्या लग्नातील फोटो तुफान व्हायरल होते. तसेच त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची तुफान चर्चा रंगली होती. या लग्नानंतर त्यांनी पुन्हा परदेशातही लग्न केले.