मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम! देशभरात कमावले 'इतके' कोटी

Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम! देशभरात कमावले 'इतके' कोटी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 07, 2023 11:28 AM IST

Animal Box Office Collection day 6: 'अ‍ॅनिमल' हा रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Animal Box Office Collection day 6
Animal Box Office Collection day 6

Animal Box Office Collection day 6: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्येही हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाने तब्बल ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अवघ्या ६ दिवसांत या चित्रपटाने ही किमया करून दाखवली आहे. जगभरातच नव्हे, तर देशातदेखील या चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या अंदाजे आकडेवारीनुसार, बुधवारी या चित्रपटाने देशांतर्गत कलेक्शनमध्ये ३० कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३१२.९६ कोटी झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या कमाईमध्ये ३४.८८ टक्के हिंदी, २५.६७ टक्के तेलुगू आणि १८.९५ टक्के वाट तामिळच्या कलेक्शनचा होता. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने ६३.८ कोटीच्या दमदार ओपनिंगनंतर, पहिल्याच रविवारी ७१.४६ कोटी रुपये कमावले आहेत. 'अ‍ॅनिमल' हा रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'संजू' हा रणबीरचा आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाने जगभरात ५८६.८५ कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे.

'अ‍ॅनिमल' या चित्रपटामध्ये अनिल कपूर, रश्मिका मंदाना, प्रेम चोप्रा आणि शक्ती कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आपली वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झाले आहे. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती बॉबी देओल याच्या पात्राची.. अनिल कपूरने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलच्या भूमिकेचे वर्णन करताना 'मास्टर स्ट्रोक' असे शब्द वापरले होते. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट पाहणारे सगळेच प्रेक्षक बॉबी देओलचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

IPL_Entry_Point