Animal BO Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची जादू पडू लागलीये फिकी? ११व्या दिवशी 'इतकी' कमाई
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Animal BO Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची जादू पडू लागलीये फिकी? ११व्या दिवशी 'इतकी' कमाई

Animal BO Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची जादू पडू लागलीये फिकी? ११व्या दिवशी 'इतकी' कमाई

Published Dec 12, 2023 10:50 AM IST

Animal Box Office Collection Day 11: सध्या रणबीर कपूर याचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुडगूस घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

Animal Box Office Collection Day 11
Animal Box Office Collection Day 11

Animal Box Office Collection Day 11: बॉलिवूडच्या कलेक्शनची गणितं पाहूनच चित्रपट हिट ठरला की, फ्लॉप याचा अंदाज लावला जातो. २०२३ हे वर्ष तसं बॉलिवूडसाठी आनंदाचं ठरलं आहे. या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांनी बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आता सध्या रणबीर कपूर याचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुडगूस घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 'जवान' आणि 'पठान'चा विक्रम मोडीत काढेल, असे म्हटले जात होते. मात्र, आता ११व्या दिवसाची कमाई पाहता हा चित्रपट आता संथ गतीकडे झुकत असल्याचे लक्षात येत आहे.

सतत धडाकेबाज कमाई करणारा हा चित्रपट आता घसरणीला लागला आहे. १०व्या दिवसाच्या तुलनेत ११व्या दिवशी या चित्रपटाची कमाई निम्मी झाली आहे. या आठवड्याची सुरुवात 'अ‍ॅनिमल'साठी फारशी चांगली ठरली नाही. या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर आणि बॉबीच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने ११व्या दिवशी १३ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा कमाईचा आकडा अंदाजे असून, यात काही बदल असू, शकतात. या आकडेवारीसह चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ४४३.२७ कोटी झाले आहे. हा कलेक्शनचा आकडा केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरचा आहे.

Rajinikanth Birthday: कशी मिळाली होती रजनीकांत यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर! वाचा किस्सा...

रणबीरच्या या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन ७१७.४६ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनची आकडेवारी:

पहिल्या दिवशी- ६३.८ कोटी

दुसऱ्या दिवशी- ६६.२७ कोटी

तिसऱ्या दिवशी- ७१.४६ कोटी

चौथ्या दिवशी- ४३.९६ कोटी

पाचव्या दिवशी- ३७.४७ कोटी

सहाव्या दिवशी- ३०.३९ कोटी

सातव्या दिवशी- २४.२३ कोटी

आठव्या दिवशी- २२.९५ कोटी

नवव्या दिवशी- ३४.७४ कोटी

दहाव्या दिवशी- ३६ कोटी

Whats_app_banner