Anil Mehta Last words to Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी वांद्रे येथील राहत्या फ्लॅटमधून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. अनिल मेहता यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण अनिल मेहता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मलायकाला फोन केला होता. ते फोनवर काय म्हणाले चला पाहूया...
अनिल यांच्या निधनाची बातमी मिळताच मलायकाचा एक्स पती अरबाज खान, अर्जुन कपूर, सलीम खान, काजोल सह इतर बॉलिवूड कलाकार तिच्या घरी पोहोचले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, आता एक मोठी माहिती समोर येत आहे. मृत्यूपूर्वी अनिल यांनी आपल्या दोन्ही मुली मलायका आणि अमृता यांना फोन केला होता.
अनिल मेहता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या दोन्ही मुली मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांना शेवटचा फोन केला होता. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनिल यांनी मलायका आणि अमृताला फोन करून आपली व्यथा मांडली. "मी आता आजारी आणि थकलो आहे" असे ते म्हणाले होते. त्यानंतरच अनिल यांनी आत्महत्या केली.
वाचा: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू
मलायका अरोराने सोशल मीडियावर पोस्ट करत वडील अनिल मेहता यांच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिने, 'आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की आमचे लाडके वडील अनिल मेहता आता या जगात नाहीत. ते अतिशय दयाळू व्यक्ती, समर्पित आजोबा, अतिशय प्रेमळ पती आणि आमचे जिवलग मित्र होते. या नुकसानीमुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, आम्ही प्रसारमाध्यमांना आणि आमच्या हितचिंतकांना विनंती करतो की आम्हाला प्रायव्हसी द्या. आम्हाला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद' या आशयाची पोस्ट केली. मलायकाची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण अनिल यांना श्रद्धांजली वाहत आहे.
अनिल अरोरा यांना जुलैमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून अनिल अरोरा यांना प्रकृतीच्या त्रासामुळे मुंबईतील रुग्णालयात सतत दाखल करण्यात येत होते. मलायका अनेकदा आई जॉयससोबत हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली होती. मात्र, त्यांना नक्की काय झाले होते हे समोर आलेले नाही. अनिल अरोरा हे मूळचे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. त्यांचे लग्न जॉयस पॉलीकॉर्प यांच्याशी झाले होते. मात्र, दोघांचा त्याचा घटस्फोट झाला होता. लग्नानंतर अनिल आणि जॉयस यांना मलायका आणि अमृता अरोरा अशा दोन मुली आहेत.