वयाची ६० ओलांडल्यानंतरही तरुणांना लाजवेल असा फिटनेस असणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग ते वेलकम बॅक या चित्रपटातील कॉमेडी असो किंवा २४ सारख्या चित्रपटातील अॅक्शन असो. त्यांच्या अभिनयाची कायम जोरदार चर्चा होत असते. आज २४ डिसेंबर रोजी अनिल कपूर यांचा वाढदिवस. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनिल कपूर यांच्या पत्नीचे नाव सुनिता असे आहे. चला जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...
काही वर्षांपूर्वी अनिल कपूर यांनी स्वत: त्यांची लव्हस्टोरी एका इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून सांगितली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळ ते कौटुंबिक जीवनातील अनेक अडचणींचा खुलासा केला होता. सुनिता यांनी कशाप्रकारे साथ दिली हे देखील सांगितले आहे.
वाचा: उंची जास्त असल्यामुळे...; अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा
एका मित्राने सुनिता यांना प्रँक कॉल करण्यासाठी अनिल कपूरचा नंबर दिला होता. जेव्हा अनिल यांनी फोन उचलला तेव्हा ते सुनिताचा आवाज ऐकून तिच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांचे बोलणे वाढू लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कित्येकदा तर सुनिता यांना भेटायला जाण्यासाठी अनिल यांच्या खिशात पैसेही नसायचे. अशा वेळीही सुनिता यांनी अनिल यांना मदत केली असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये न चुकता नमूद केले होते.
सुनिता या एका बँक कर्मचाऱ्याची मुलगी होती आणि अनिल हे मायानगरीमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. थोडेफार यश मिळाल्याशिवाय सुनिताला लग्नाची मागणी कशी घालणार असा प्रश्न अनिल यांना पडायचा. काही दिवसात अनिल यांनी केवळ १० लोकांच्या उपस्थित लग्न केले. मुख्य म्हणजे लग्नानंतर तिसऱ्या दिवशी अनिल पुन्हा त्याच्या कामात व्यग्र झाले होते. त्यामुळे सुनिता एकट्याच हनीमूनला गेल्या होत्या असे अनिल यांनी सांगितले.
संबंधित बातम्या