बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सबाबत नेहमीच चर्चा असते. त्यांचा लूक, फॅशन सेन्स इथपासून ते कोणाला डेट करत आहेत याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने त्याला ओळख तर मिळवून दिली नाही. मात्र, त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. आज हर्षवर्धनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी..
हर्षवर्धनचा जन्म ९ नोव्हेंबर १९९० साली झाली. तो आता ३२ वर्षांच्या आहे. हर्षवर्धनने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'मिर्झ्या' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला या चित्रपटाने फारशी लोकप्रियता मिळवून दिली नाही. त्यानंतर त्याने "भावेश जोशी सुपरहिरो," "रे," आणि "थार" या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचे हे तीनही चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. हर्षवर्धनचा एकही चित्रपट हवा तसा चालला नाही. मग त्याच्याकडे एकूण किती संपत्ती असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: मनीष मल्होत्राच्या पार्टीत ऐश्वर्याने मारली सलमानला मिठी? फोटोची चर्चा
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हर्षवर्धन कपूरकडे जवळपास ४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याची ही संपत्ती काही चित्रपटांमधून मिळालेल्या फीजमधून आहे. तसेच हर्षवर्धनचे काही साईट बिझनेस देखील आहेत. त्यातून ही त्याला पैसे मिळतात.
हर्षवर्धनच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. रिया चक्रवर्ती, सपना पब्बीनंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत तो डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर तो आता अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
संबंधित बातम्या