अनिल कपूरचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूरने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित 'भावेश जोशी' या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा मराठमोळा अभिनेता हर्षवर्धनवर चांगलाच चिडला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा किस्सा सांगितला आहे.
हा अभिनेता दुसरातिसरा कोणी नसून अभिनेता हृषिकेश जोशी आहे. त्याचा लवकरच 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने 'भावेश जोशी' चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा सांगितला आहे.
वाचा: प्राजक्ता माळीने किसिंग सीन दिलेल्या ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर पाहिलात का?
'फेमस मधून निघालो संध्याकाळी की भांडूपच्या स्टुडिओत नाइट शिफ्ट करायचो.. जवळपास ७२ तास काम करायचो. हर्षवर्धनसोबत ॲक्शन सीन असायचे रात्री. सलग असायचे पण इतके मजेशीर होते ते सीन.. मला असं भिंतीवर ठकलतो आणि ठरल्यावर मी वळतो. त्यानंतर तो स्प्रे काढतो आणि माझ्या तोंडावर मारतो. पहिल्यावेळी त्याने चुकून त्याच्या तोंडावर तो स्फ्रे मारला. परत टेक. या सीनसाठी त्याने अनेक रिटेक दिले. शेवटी दिग्दर्शकाने त्याच्या हाताचा स्फ्रे मारतानाचा क्लोजअप शॉट घेतला' असे हृषिकेश म्हणाला.
पुढे तो म्हणाला, 'त्याच्यानंतर मला खूर्चीला बांधलेलं असतं. तोंडाला पट्टी लावलेली असते. हर्षवर्धन एक पक्कड आणतो आणि माझ्या गुडघ्याला मारतो. माझ्या पायाला कवच लावलेलं असतं आणि त्याने मला जिकडे कवच घातलेलं नाही तिथेच मारलं. मी इतका कळवलो की दिग्दर्शकाला तो योग्य शॉट वाटला. एक सीन असा होता मी मला पालतथं पाडून तो माझ्या पाठिवर बसतो. मला त्याला सांगावं लागलं की अभिनय करायचा आहे. एकतर छोटीशी खोली, धूर सोडलेला सगळा, पालथं पडून हात मागे बांधलेले. तो माझ्या पाठीवर येऊन बसला. शेवटी एका पॉइंटला मी चिडलो आणि बस झालं आता असे म्हटले. मी अक्षरश: मेलो असतो तिथे. कधी संपतो तो सीन असं झालं होतं. त्यावेळी असा तीन अडकून सीताराम होतो.'
‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबतच वैभव तत्तवादी आणि आलोक राजवाडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशीने केले आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या