'बिग बॉस ओटीटी ३' सुरू होण्यास अवघे एक, दोन दिवस शिल्लक आहेत. शुक्रवार, २१ जूनपासून या शोचे जिओ सिनेमावर स्ट्रीमिंग सुरू होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी १' करण जोहरने होस्ट केला होता. तर, 'बिग बॉस ओटीटी २' सलमान खानने होस्ट केला होता. तर, अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' होस्ट करणार आहे. अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३'च्या माध्यमातून होस्ट म्हणून पदार्पण करणार आहे. अशातच ‘लाइव्ह हिंदुस्थान’ने अनिल कपूर यांच्याशी खास संवाद साधला. वाचा या रिअॅलिटी शोबद्दल आणि त्यात सहभागी स्पर्धकांबद्दल ते काय म्हणाले.
जेव्हा मला बिग बॉसची ऑफर आली, तेव्हा माझ्या मनातून आवाज आला...'यार मी हे केलं पाहिजे! मी याआधी असं काहीच कधीच केलं नव्हतं. मजा येईल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी मनापासून विचारतो की, मी हे करावे की नाही? बिग बॉसबद्दल विचारले असता माझं मन मला म्हणालं की, हे करायला हवं. त्यामुळे मला नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. माझे संपर्क वाढतील. जे मी आजवर केले नाही, त्यासाठी मला मिळालेली ही संधी आहे. '
सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी स्वत: आश्चर्यचकित झालो. माझ्या या निर्णयावर घरातील कोणीही प्रश्न चिन्ह उपस्थित करत नसले, तरी नेहमी माझ्या निर्णयावर तीन जण खूश असतात आणि एक जण तरी नाराज असतो. परंतु, यावेळी तसे झाले नाही. सर्वजण माझ्या निर्णयावर खूश होते.
मी स्वत: शिकेन आणि त्यांनाही शिकवीन, ज्यांना शिकायचे आहे, त्यांनाच मी शिकवेन आणि ज्यांना शिकायचे नाही त्यांना सांगेन, ‘राहू दे, तुमचं काम, तुमचं नशीब आणि तुमचं भविष्य तुमच्या हातीच!’ बाकी जशी प्रत्येक माणसाची बोलण्याची स्वतःची पद्धत असते, तशी माझीही आहे. माझेही स्वतःचे शिष्टाचार आहेत. मला मनापासून जे करावे वाटेल, ते मी करेन. मी कोणाचीही कॉपी करणार नाही.
यावेळी अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. अशा काही गोष्टी असतील, ज्या पाहिल्यावर तुम्ही म्हणाल की, ‘अनिलही तसाच आहे! तो ही बोलू शकतो! हे देखील हे करू शकतो! प्रतिक्रियाही देऊ शकते! वाह हे खूप छान आहे!’
तुम्हाला कधी संधी मिळाली तर सोनम (अनिलची मोठी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर) किंवा रिया (अनिलची धाकटी मुलगी आणि चित्रपट निर्माती रिया कपूर) यांना नक्की विचारा की, मी कसा वागतो.