Sushmita Sen: ललित मोदी, वसिम अक्रम ते अंबानी; ‘या’ प्रतिष्ठित व्यक्तींशी जोडलं गेलेलं सुश्मिता सेनचे नाव
Sushmita Sen affairs: सुष्मिताचे नाव आजवर अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींशी जोडले गेले. मात्र ती अद्याप ती अविवाहित आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. केवळ चित्रपट आणि अभिनयच नव्हे, तर सुष्मिता सध्या तिच्या वैक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सुष्मिताचे नाव आजवर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी जोडले गेले आहे. आज तिच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊया तिची लव्ह लाईफ...
ट्रेंडिंग न्यूज
विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुष्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या ४७व्या वर्षी देखील सुष्मिता अविवाहित आहे. बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवत असताना सुष्मिता तिच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत असायची. काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेनचे नाव आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याशी जोडले जात होते. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सुश्मिताने यावर स्पष्टीकरण देत या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले.
वाचा: वर्ल्ड कप फायनलपूर्वी रजनीकांतची भविष्यवाणी, 'मला विश्वास आहे भारत...'
ललित मोदींच्या आधी सुष्मिताचे नाव अनेक व्यक्तींशी जोडले गेले. ‘दस्तक’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक विक्रम भट यांच्याबरोबर सुष्मिताची जवळीक वाढली. पण विक्रम विवाहित असल्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. विक्रम भट्टबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिने हॉटेल उद्योगाशी संबंधित असलेल्या संजय नारंगला डेट केले. फार काळ हे नाते टिकले नाही. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमशी सुष्मिताचे नाव जोडण्यात आले होते. पण ग्लॅमरच्या दुनियेतील सु्ष्मिताचा वावर वसीम यांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला.
सुष्मिताचे नाव अभिनेता रणदीप हुड्डाशी देखील जोडले गेले होते. ‘कर्मा और होली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचे सुत जुळले होते. जवळपास ३ वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नातं देखील फार काळ टिकलं नाही. त्यानंतर सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती. त्यांचे एकत्र फिरतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. पण त्यांचा ब्रेकअप झाला. सुश्मिताचा मॅनेजर बंटी सचदेवा याच्याबरोबरही तिचे रिलेशनशिप असल्याची चर्चा होती. पण सुश्मिताचे बंटी सचदेवाबरोबरही पटलं नाही आणि ते वेगळे झाले.
सुश्मिता सेन आणि उद्योगपती अनिल अंबानी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अनिल यांनी तिला हिऱ्याची अंगठीही दिली होती, असेही बोलले जात होते. पण कालांतराने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सुष्मिता वयाने १५ वर्षांनी लहान रोहमनला डेट करत होती. पण त्यांचा देखील ब्रेक झाला होता. आता ते पुन्हा एकत्र दिसत आहेत.
विभाग