Angry Young Man: 'शोले' चित्रपट कसा सुचला? सलीम-जावेदच्या तोंडून ऐका सुपरहिट सिनेमांच्या पटकथेमागील कथा-angry young men trailer out a dive into nostalgic world of salim javed s cinematic journey ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Angry Young Man: 'शोले' चित्रपट कसा सुचला? सलीम-जावेदच्या तोंडून ऐका सुपरहिट सिनेमांच्या पटकथेमागील कथा

Angry Young Man: 'शोले' चित्रपट कसा सुचला? सलीम-जावेदच्या तोंडून ऐका सुपरहिट सिनेमांच्या पटकथेमागील कथा

Aug 13, 2024 04:14 PM IST

Angry Young Man-The Salim Javed Story: 'अँग्री यंग मॅन : द सलीम-जावेद स्टोरी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही बहुचर्चित डॉक्यु-सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर २० ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Angry Young Man-The Salim Javed Story
Angry Young Man-The Salim Javed Story

Angry Young Man-The Salim Javed Story: 'अँग्री यंग मॅन' या डॉक्यु-सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. २ मिनिटे ४३ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर आपली कहाणी सांगताना दिसत आहेत. तर, इतर सुपरस्टार्स त्यांच्या कथा आणि आठवणी सांगताना  दिसत आहेत. सलीम-जावेद यांच्या जोडीबद्दल बोलताना सलमान खान म्हणतो, ‘जर कुणाला मारायचे असेल ना, तर आपल्या कामाने मारा. तेच त्यांनी आयुष्यात केले. कामानेच सगळ्यांना मारलं.’  

या ट्रेलरमध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, करण जोहर, फरहान अख्तर, आमिर खान, हृतिक रोशन, यश, शबाना आझमी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी १९७०च्या दशकातील सलीम-जावेद लेखन क्रांतीबद्दल बोलताना दिसले आहेत. या सीरिजमधून अनेक चित्रपटांच्या पटकथेमागच्या कथा उलगडल्या जाणार आहेत. 'शोले' सारख्या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचे न ऐकलेले किस्से आता समोर येणार आहेत. प्रेक्षकांना आता या सीरिजची उत्सुकता लागून राहिली आहे. 

पाहा ट्रेलर:

काय म्हणाले सलीम खान?

या भन्नाट डॉक्यु-सीरिजबद्दल बोलताना सलीम खान म्हणाले की, ‘मी माझ्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. पण, नंतर मला समजले की, माझी खरी ताकद कथाकथनात आणि माझ्या लेखणीत आहे. त्यामुळे मी लेखनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. मग मला जावेद भेटला, ज्याला माझ्याप्रमाणेच लेखनाची आवड होती. आम्ही एकत्र काही उत्तम कथा लिहिल्या, ज्याचा मला आजही अभिमान आहे. आमची हीच कहाणी पुढच्या पिढ्यांसाठी रेकॉर्ड केली जात आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. मला आशा आहे की, ही कहाणी लोकांना त्यांचे सर्वोत्तम काम करण्याची प्रेरणा देईल.’ 

अनुराधा पौडवाल यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर! ‘या’ कलाकारांचाही होणार सन्मान

जावेद अख्तर म्हणाले...

या सीरिजच्या ट्रेलर लाँचनंतर जावेद अख्तर म्हणाले की, ‘जेव्हा मी अगदी लहान वयात या शहरात आलो, तेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती. ना कुणाचे संपर्क होते, ना खिशात पैसे होते. मी अनेकदा उपाशी पोटी झोपून जायचो. असे असूनही मी कधीच हार मानली नाही. मला नेहमी वाटायचे की, मला माझी जीवनकहाणी या संपूर्ण जगासोबत शेअर करायची आहे आणि आज बघा या डॉक्यु-सीरिजमध्ये आमची कथा दाखवली जाणार आहे. मी सर्वांचे त्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानू इच्छितो.’

डॉक्युसीरिज कधी रिलीज होणार?

ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही डॉक्यु-सीरिज २० ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

विभाग