मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: पॅरिसमधील कार्यक्रमात अनन्याने असे काही केले की नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: पॅरिसमधील कार्यक्रमात अनन्याने असे काही केले की नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2024 05:12 PM IST

Ananya Pandey Viral Video: अभिनेत्री अनन्या पांडेचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

Ananya Pandey
Ananya Pandey

बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सतत चर्चेत असतात. त्यांची लग्झरी लाइफ कायमच सर्वांचे आकर्षण ठरत असते. नुकताच अभिनेत्री अनन्या पांडेने एका कार्यक्रमात रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अनन्या पांडेने पॅरिस कॉउचर वीकमध्ये सहभाग घेतला. तिने रॅम्पवर वॉक केला. यावेळी अनन्यानं प्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्रासाठी वॉक केले. तिच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनन्याही ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस, हाय हिल्स अन् हातात भली मोठी जाळी अशा लूकमध्ये रॅम्प वॉक कपताना दिसत आहे.
वाचा: लता मंगेशकर यांच्या आवाजात 'राम आएंगे', AIची कमाल

अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी खिल्ली उडवली आहे. एका यूजरने "ही जाळी घेऊन चालताना अनन्या खूप स्ट्रगल करत आहे" अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने "दीदी, हा कार्यक्रम झाल्यानंतर माझी मच्छरदाणी परत कर" असे म्हणत अनन्याला ट्रोल केले आहे.

अनन्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरशी जोडले जात आहे. त्यांना अनेकदा एकत्र फिरताना पाहिले गेले आहे. तिचा काही दिवसांपूर्वी "खो गए हम कहां" हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते. तिच्या या भूमिकेचे चाहत्यांनी कौतुक केले.

WhatsApp channel

विभाग