सध्या सगळीकडे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. ग्रँड प्रीवेडींग कार्यक्रमानंतर आता अंबानी कुटुंबीय राधिकाचे स्वागत करण्यासाठी तयार झाले आहेत. अंबानी कुटुंबीय लग्नाची जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. नीता अंबानी या मुलाची पत्रिका काशी विश्वनाथाच्या चरणी ठेवण्यासाठी गेल्या होता. त्याच वेळी त्यांनी वाराणसीमध्ये लेकाच्या लग्नासाठी काही खास साड्या खरेदी केल्या. त्यांनी जवळपास ६० साड्या खरेदी केल्या.
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसी दौऱ्याच्या वेळी नीता अंबानी यांनी रात्री उशिरा तेथील एका हॉटेलमध्ये बनारसच्या विणकरांनी बनवलेल्या साड्यांचा स्टॉल लावला होता. इमरेश कुशवाह या साडी व्यापाऱ्यांशी नीता अंबानी यांच्या टीमने संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी नीता अंबानी यांच्यासाठी डिझायनर साड्यांचा स्टॉल लावला. सर्व साड्यांपैकी नीता अंबानी यांना कोनिया ट्रेंडची लाख बूटी साडी आवडली. ती त्यांनी स्वतःसाठी खरेदी केली होती.
वाचा: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
अमरेश कुशवाह यांनी नीता अंबानी यांनी खरेदी केलेल्या साडीविषयी माहिती दिली आहे. नीता अंबानी यांच्या टीममधील लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी जवळपास ६० साड्या घेऊन त्या राहात असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. त्यांनी रात्री स्वत: या सगळ्या साड्या पाहिल्या. सोनं-चांदीची कारागिरी असलेली, लाल रंगाची बुटी साडी त्यांना जास्त आवडली. माझ्याकडील अजून काही साड्या देखील त्यांनी खरेदी केल्या होत्या. नीता अंबानी यांना आवडलेली साडी बनवण्यासाठी जवळपास ५० ते ६० दिवस लागले होते. त्यांच्या या साडीची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे असे अमरेश कुशवाह म्हणाले.
वाचा: 'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?
अमरेश कुशवाह यांच्याकडे काम करणारे कारागीर छोटे लाल पॉल यांनी नीता अंबानी यांची साडी तयार केली आहे. नीता अंबानी यांची साडी सिल्कच्या कपड्यापासून विण्यात आली आहे. त्यावर चांदी आणि सोन्याचा लेप देण्यात आला आहे. ही साडी तयार करायला जवळपास ६० ते ६२ दिवस लागले. नीता अंबानी यांना देखील मी विणलेली साडी आवडली असे छोटे लाल पॉल म्हणाले.
वाचा: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता मार्च महिन्यात प्रीवेडींग सोहळा पार पडला. त्यापाठोपाठ ईटलीमध्ये दुसरा प्रीवेडींग सोहळा पार पडला. आता १२ जुलै रोजी मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पडणार आहे. नीता अंबानी यांनी अनंतच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे हा शाही लग्नसोहळा पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
संबंधित बातम्या