'उगाच सुपरहिरो म्हणत नाही', अमिताभ बच्चन यांच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'उगाच सुपरहिरो म्हणत नाही', अमिताभ बच्चन यांच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने

'उगाच सुपरहिरो म्हणत नाही', अमिताभ बच्चन यांच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 14, 2024 08:44 AM IST

Anant Ambani Wedding: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांचे कृत्य पाहून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

महेंद्र सिंह धोनी, साक्षी धोनी, अमिताभ बच्चन
महेंद्र सिंह धोनी, साक्षी धोनी, अमिताभ बच्चन

Anant Ambani Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा अखेर १२ जुलै रोजी पार पडला. त्यांच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडपासून ते क्रीडा विश्वापर्यंत आणि राजकीय वर्तुळापासून ते बिझनेस क्षेत्रापर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली. महानायक अमिताभ बच्चन आणि महेंद्रसिंग धोनी देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह या लग्नाला उपस्थित होते. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.

काय आहे व्हिडीओ?

महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हे एकत्र अंबानी कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. धोनी कुटुंबासोबत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देत होता. धोनीच्या मागेच महानायक अमिताभ बच्चन उभे होते. ते बराच वेळ तेथे वाट पाहात होते. त्यांनी एकदाही धोनीला लवकर कर किंवा पुढे येऊन पहिले फोटोला पोझ दिलेली नाही. ते शांतपण त्यांची बारी येण्याची वाट पाहात होते. अमिताभ यांच्या या कृत्याची सोशल मीडियावर वाहवाह होत आहे.

नेटकऱ्यांनी केले अमिताभ यांचे कौतुक

सोशल मीडियावर अमिताभ यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने कमेंट करत, 'अमिताभ यांना उगाच सुपरहिरो म्हणत नाही' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने इथे भाईजान असता तर तो पुढे कधी गेला असता कळालं पण नसतं असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या कृतीने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात.

अमिताभ यांच्या कामाविषयी

नुकताच प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा कल्की 2898 एडी हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा महाभारताच्या काळाला भविष्याशी जोडते. चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी बोलताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला.
वाचा: अनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातला अनारकली ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का

नाग अश्विनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, "अमिताभ बच्चन हे असे अभिनेते आहेत जे स्टार्सना नखरे न दाखवता वेळेवर सेटवर पोहोचायचे आणि जड मेकअप करून आपल्या बारीची वाट पाहत असत. अमिताभ सेटवर शिस्तबद्ध होते. एकदा बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अमिताभ हे माझ्या जवळ आले आणि त्यांनी विचारले की तुम्ही वॉशरूममध्ये जाऊ शकता का? यावेळी नाग अश्विनने त्याला उत्तर दिले की, एकदम सर. तुम्ही का विचारताय? तुम्हाला विचारण्याची गरज नाही."

Whats_app_banner