Anant Ambani-Radhika Merchant Wedding: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज त्याच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार आहे. अनंत आज म्हणजेच १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स मार्च महिन्यापासून सुरू झाले होते, जे आता लग्नापर्यंत पोहोचले आहेत. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह, हॉलिवूड आणि इतर अनेक परदेशी चित्रपट कलाकारांनीही अनेक महिने चाललेल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये भाग घेतला होता. नुकताच प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबरही या लग्न सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी भारतात आला होता. आता अनंत अंबानीच्या लग्नात आणखी काही हॉलिवूड कलाकार सहभागी होणार आहेत.
आता प्री-वेडिंग फंक्शन मोठ्या थाटामाटात पार पडल्यामुळे, लग्न आणखीनच शानदार होणार आहे. हे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी परदेशी पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंबानी कुटुंबात कोणतेही कार्यक्रम असले की, बॉलिवूडचे स्टार्स आवर्जून हजेरी लावतात. आता लग्नाच्या दिवशीही बॉलिवूड कलाकार अंबानींच्या लग्नसोहळ्यात चार चांद लावताना दिसणार आहेत. पण, या सगळ्यांसोबतच हॉलिवूडमधील अनेक स्टार्सही यात सहभागी होत आहेत. या लग्नाला हॉलिवूडमधून कोण-कोण हजेरी लावणार, ते जाणून घेऊया...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हॉलिवूड स्टार किम कार्दशियनही हजेरी लावणार आहे. गुरुवारी रात्री ती मुंबईत पोहोचली आहे. तिच्यासोबत तिची बहीण ख्लो कार्दशियनही या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. या दोन लोकप्रिय बहिणींशिवाय हॉलिवूड अभिनेता आणि कुस्तीपटू जॉन सेना अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कॅनेडियन रॅपर आणि गायक कीनन वारसामे देखील या लग्न सोहळ्यात सहभागी होताना दिसणार आहे. त्यालाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय गायक लुईस फोन्सी, रॅपर आणि गायिका रेमा यांचीही नावं विदेशी फिल्म स्टार्सच्या यादीत आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी निक जोनासही पत्नी प्रियांका चोप्रासोबत भारतात आला आहे.
संबंधित बातम्या