Anant-Radhika Wedding:रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटशी विवाह केला. काल म्हणजे १२ जुलै २०२४ रोजी दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज लोकांनी हजेरी लावली. पण बच्चन कुटुंबीय मात्र चर्चेत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाला संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र पोहोचले होते. मात्र, बिग बींची सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्या बच्चन दिसली नसली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, जावई, मुलगा अभिषेक बच्चन, नात नव्या आणि नातू अगस्त्य हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकाने उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली. नेहमी फोटोग्राफर्सवर चिडणाऱ्या जया बच्चन यावेळी फोटोसाठी चांगली पोझ देताना दिसत होत्या. श्वेताचा मुलगी नव्या नवेली नंदाचा लूक देखील सर्वांना आवडला आहे. पण सर्वांच्यानजरा त्यांच्यासोबत या लग्नाला न आलेल्या ऐश्वर्या राय आणि आराध्यावर होत्या.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ
अनंत आणि राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. रेड आणि गोल्डन ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेससोबत हेवी नेकलेस आणि मांग टीका असा ऐश्वर्याचा सिंपल लूक दिसत होता. तसेच ऐश्वर्याची लेक आराध्या देखील अतिशय क्यूट दिसत होती. आराध्याने आकाशी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. त्यावर डायमंडचे गळ्यातले, कानातले आणि हातात बांगडी घातल्याचे दिसत आहे. आराध्याचा हा लूकपाहून ती आईला देखील टक्कर देत असल्याचे सर्वजण बोलत आहेत.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या
ऐश्वर्या राय लेक आराध्याला घेऊन जेव्हा अनंतच्या लग्नसोहळ्याला पोहोचली तेव्हा तेथे एण्ट्रीला रेखा देखील उभी होती. ते पाहून रेखाने ऐश्वर्याला मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केले. हा क्षण खरोखरच सुंदर होता. पॅपराझींनीही हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. मात्र बच्चन कुटुंबासोबत लग्नाला उपस्थित न राहिल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त होण्याच्या बातम्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. ऐश्वर्या अभिषेकसोबत लग्नाला का गेली नाही, हे सध्या कोणालाच माहित नाही.
वाचा: Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी
संबंधित बातम्या