Anant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची हजेरी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची हजेरी

Anant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची हजेरी

Anant Ambani sangeet: आलिया भट्ट ते कियारा अडवाणी, राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला कलाकारांची हजेरी

Published Jul 06, 2024 11:38 AM IST
  • twitter
  • twitter
  • Anant Ambani-Radhika's sangeet: बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
काल रात्री अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी जोडपी उपस्थित होती. पाहुण्यांच्या यादीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, मीरा राजपूत आणि शाहिद कपूर, अथिया शेट्टी आणि केएल राहुल, एमएस धोनी आणि साक्षी धोनी, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया, खुशी कपूर आणि वेदांग रैना यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. चला पाहूया या सोहळ्यातील काही खास फोटो…
twitterfacebook
share
(1 / 11)

(HT Photo/Varinder Chawla)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी अबु जानी व संदीप खोसलाने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला आहे. अनंतचा पारंपारिक पोशाख खऱ्या सोन्यापासून बनवण्यात आला होता, तर राधिकाने स्वारोव्स्की क्रिस्टलपासून बनवलेल्या ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि लेहंगा सेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
twitterfacebook
share
(2 / 11)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काळ्या रंगाच्या पारंपारिक वेशभूषेत या सोहळ्यात दिसले. आलियाने सिक्विन सजवलेला ब्रालेट आणि लेहंगा  परिधान केला होता, तर रणबीरने तिला मॅचिंग शेरवानी घातली आहे.
twitterfacebook
share
(3 / 11)

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या ग्लॅमरस आउटफिट्ससह संगीत सोहळ्यात हजेरी लावली. कियाराने स्ट्रॅपलेस कॉर्सेट ब्लाऊज, मरमेड स्टाईलचा स्कर्ट आणि दुपट्टा असलेली साडी नेसली आहे. तर सिद्धार्थने काळ्या रंगाची शेरवानी घातली आहे.
twitterfacebook
share
(4 / 11)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला एमएस धोनी आणि पत्नी साक्षीने देखील हजेरी लावली. धोनीने क्रिम कलरचा कुर्ता, फ्लोरल जॅकेट आणि पांढरी पँट परिधान केली आहे. तर साक्षीने ऑफ शोल्डर ब्लाऊज, फ्लोरल लेहंगा आणि नेट दुपट्टा घेतला आहे.
twitterfacebook
share
(5 / 11)

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होते. सिक्विन ब्लाऊज, मोरपंखांनी सजवलेला मरमेड लेहंगा आणि मॅचिंग दुपट्ट्यात जान्हवी सुंदर दिसत होती. शिखरने काळ्या रंगाच्या शेरवानी सेटमध्ये तिला साथ दिली
twitterfacebook
share
(6 / 11)

वेदांत रैना आणि खुशी कपूर यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात मॅचिंग रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघेही अतिशय सुंदर दिसत होते.
twitterfacebook
share
(7 / 11)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला मीरा राजपूत आणि शाहिद कपूर उपस्थित होते. मीराने काळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी लेहंगा सेट परिधान केला होता, तर शाहिदने लाल आणि काळ्या रंगाचा शेरवानी कुर्ता घातला आहे.
twitterfacebook
share
(8 / 11)

अथिया शेट्टीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी फ्लोरल एम्ब्रॉयडरी बेज रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज ची निवड केली होती. काळ्या रंगाचा कुर्ता, बंदगळा जॅकेट आणि मॅचिंग पँट सेटमध्ये केएल राहुल दिसला.
twitterfacebook
share
(9 / 11)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी हजेरी लावली होती. वरुण धवनने जॅकेट आणि पांढऱ्या पँटमध्ये दिसला. तर नताशाने आकाशी रंगाचा लेहंगा परिधान केला.
twitterfacebook
share
(10 / 11)

अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनी देखील हजेरी लावली. जेनेलिया हिरव्या रंगाच्या अनारकली गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तर रितेशने ब्रोकेड एम्ब्रॉयडरी शेरवानी सेट घातला आहे.
twitterfacebook
share
(11 / 11)

इतर गॅलरीज