मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रणबीर-आलियाच्या लेकीचा थाट! राहाच्या क्युटनेसने जिंकलं साऱ्यांचं मन

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रणबीर-आलियाच्या लेकीचा थाट! राहाच्या क्युटनेसने जिंकलं साऱ्यांचं मन

Jun 03, 2024 08:40 AM IST

बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपली मुलगी राहासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीला उपस्थित होते.

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रणबीर-आलियाच्या लेकीचा थाट!
अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रणबीर-आलियाच्या लेकीचा थाट!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा ग्रँड क्रूझ प्री-वेडिंग सेलिब्रेशन उत्साहात पार पडलं असून, आता या क्रूझ प्रवासाचे काही खास क्षण सोशल मीडियावर समोर येऊ लागले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा मुलगी राहाससोबतचा एक नवा फोटो समोर आला असून, तो सर्वांची मने जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया, रणबीर आणि त्यांची मुलगी राहा यांच्या नावाच्या एका फॅन पेजने क्रूझवर प्री-वेडिंग इव्हेंटमधील आई-मुलीचा फोटो पोस्ट केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

या फोटोत पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये आलिया आपल्या मुलीला हातात घेऊन फिरताना दिसत आहे. तर, राहा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्यूट दिसत आहे. चेहऱ्यावर गोड हसू आणि डोळ्यात चमक घेऊन ती आईस्क्रीम खाताना दिसली होती. या फोटोमध्ये आई आलियाच्या हातात आईस्क्रीम दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना फॅन पेजने लिहिले की, ‘अनंत अंबानी यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग प्री वेडिंग फोटोमध्ये आलिया भट्ट आपल्या मुलीसोबत आईस्क्रीम खाताना दिसली.’

राहाने जिंकली मनं!

सोशल मीडियावर हा फोटो सगळ्यांची मनं जिंकत आहे. युजर्स राहावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तिला ‘मंचकिन’ म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ती खूप क्यूट आहे.' तर, दुसऱ्या युजरने लिहिले की, 'क्यूटी'. एका युजरने 'क्यूटेस्ट' म्हणत हा फोटो शेअर केला आहे. तर, एकाने लिहिले की, 'रणबीर कपूरची कॉपी'. या फोटोवर अनेक युजर्सनी दिलखुलास आणि किस इमोजी टाकले.

रणबीर या फोटोतून गायब असला, तरी अभिनेता शाहरुख खानसोबतचा त्याचा फोटो रविवारी पहाटे समोर आला होता. सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा धाकटा मुलगा अबराम यांच्याशी तो गप्पा मारताना दिसला होता. या व्हिडीओमध्ये शाहरुख, रणबीर आणि अबराम एकमेकांशी गप्पा मारताना दिसले होते. गेल्या रविवारी रणबीर आणि आलिया आपली मुलगी राहा कपूरसोबत मुंबईहून इटलीला गेले होते. मुंबईच्या कलिना विमानतळावरून निघालेल्या या कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हुबेहूब शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रेयसीसारखी दिसते सोनाक्षी सिन्हा! रीना रॉयची मुलगी म्हणताच अभिनेत्री म्हणाली...

अनंत-राधिकाच्या लग्नाचा शाही सोहळा!

इटलीमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी अंबानी कुटुंबाने चार दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला होता. शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह, अनन्या पांडे, सुहाना खान, गौरी खान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, शनाया कपूर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेलिब्रेशनला हजेरी लावली होती.

दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्याला १२ जुलै रोजी मुख्य विवाह सोहळ्याने सुरुवात होणार आहे. या सोहळ्यानंतर शनिवार, १३ जुलै रोजी शुभ आशीर्वादासाठी एक खास दिवस ठेवण्यात येणार आहे. रविवार, १४ जुलै रोजी ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४