सध्या संपूर्ण देशात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग विधींना सुरुवात झाली आहे. सोमवारी दोघांचा हळदीचा सोहळा पार पडला. कुटुंबातील सदस्यांसोबतच बॉलिवूडचे अनेक सेलेब्सही या सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, कलाकारांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
अनंत आणि राधिकाच्या हळदी सोहळ्याला सर्व बॉलिवूड कलाकार पारंपरिक लूकमध्ये दिसले. हळदी सोहळ्यातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमान खान पहिल्यांदाच निळ्या रंगाची जीन्स आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून हजर होता. तसेच समोर आलेल्या फोटोमध्ये सलमानच्या चेहऱ्यावर हळद दिसत आहे.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट
दुसरीकडे अंबानींच्या हळदी सोहळ्यातील अभिनेता रणवीर सिंगचा देखील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हळद लागलेली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो पान खाताना दिसत आहे.
सलमान आणि रणवीरने यापूर्वी अनंत-राधिकाच्या संगीत समारंभात परफॉर्म केले होते. रणवीरने सलमानच्या नो एण्ट्री गाण्यावर डान्स केला होता. तर सलमानने अनंतसोबत पहिल्यांदाच ऐसा हुआ है गाण्यावर डान्स केला. तसेच या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरने परफॉर्म करत चार चाँद लावले होते.
वाचा: श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान, बादशाह आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी हळदी कार्यक्रमाला हजेरी लावली. जान्हवी, अनन्या, सारा या हळदी सोहळ्यात अतिशय सुंदर दिसत होत्या. जान्हवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. साराने तिथे रंगीबेरंगी लेहंगा-चोली परिधान केली होती. अनन्याने या सोहळ्यात अनारकली ड्रेस परिधान केला होता. या तिघींचाही लूक पाहण्यासारखा आहे.
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!
अनंत आणि राधिकाच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर १२ जुलै रोजी दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. ज्या लग्नाचे प्री-वेडिंग इतके भव्य झाले आहे, त्या लग्नात काय धमाका होणार हे पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असल्याने चाहते हे लग्न पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.