Anant Ambani Pre Wedding Fees:प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कॅरेबियन पॉप स्टार रिहाना हिने चांगलाच कल्ला केला. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत चाललेल्या या प्री-वेडिंग सोहळ्यात रिहानाने पहिल्याच दिवशी धमाकेदार परफॉर्मन्स दिला. रिहानाची भारतातील एन्ट्री,परफॉर्मन्स आणि एअरपोर्ट लूक चांगलाच व्हायरल झाला होता. रिहानाच्या आधीही परदेशातील अनेक मोठ्या गायकांनी अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केले आहे, ज्यासाठी त्यांनी अंबानींकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.
गुजरातमधील जामनगर येथे आयोजित अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला कॅरेबियन पॉप स्टार रिहानाने हजेरी लावली होती. इव्हेंटच्या पहिल्या संध्याकाळी परफॉर्म करताना रिहानाने आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे भरपूर मनोरंजन केले. रिहाना एका परफॉर्मन्ससाठी १२ कोटी ते ९९ कोटी रुपये घेते. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार रिहानाने अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जवळपास ५० कोटी रुपयांहून अधिकची फी घेतली आहे.
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायिका बियॉन्स नोल्सने २०१८मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या एंगेजमेंटमध्ये परफॉर्म केले होते. ईशा आणि आनंदचा प्री-वेडिंग सोहळा राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडला होता. यामध्ये बियॉन्सेने एक शानदार गाणं सादर केले होते. रिपोर्ट्सनुसार, बियॉन्सेने या परफॉर्मन्ससाठी ३३ कोटी रुपये घेतले होते.
प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिननेही अंबानी कुटुंबातील कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केले आहे. २०२०मध्ये,ख्रिसने अंबानी कुटुंबाचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नात स्टेजवर गाणे गायले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबानी यांनी ख्रिसला ८ कोटी रुपये फी दिली होती.
२०१९मध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या मंगल पर्व समारंभात प्रसिद्ध गायक ॲडम लेविनने गायले होते. मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यासाठी ॲडम लेविनने ८ कोटी ते १२ कोटी रुपये आकारले होते.
सुप्रसिद्ध गायक जॉन लीजेंडने अंबानी कुटुंबाच्या भव्य कार्यक्रमात परफॉर्म केले होते. २०१८मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची एंगेजमेंट इटलीच्या लेक कोमोमध्ये झाली होती. या सोहळ्यात जॉन लीजेंडने परफॉर्मन्स दिला होता. यासाठी जॉन लीजेंड यांनी ८ कोटी रुपये फी आकारली.