जगभरात सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबाना यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अनंत हा राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. पण लग्नापूर्वी होणाऱ्या प्रीवेडिंग कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा पहिला प्रीवेडिंग सोहळा जामनगर येथे पार पडला. त्यानंतर आता दुसरा प्रीवेडिंग सोहळा इटली येथील क्रूजमध्ये सुरु आहे. या सोहळ्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याला २९ मे पासून सुरुवात झाली आहे. हा सोहळा ३१ मे रोजी संपणार आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार पोहोचले आहेत. या क्रूजवरील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकन बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे. पण व्हिडीओ पाहून कुणालाही विश्वास बसत नाही की हे बॅकस्ट्रीट बॉईज आहेत. असे म्हटले जात आहे की व्हिडीओमध्ये बॅकस्ट्रीट बँडमधील निक कार्टर, हॉवी डोरो, ब्रायन लिट्रेल, एजे मॅक्लिन आणि केविन रिचर्डसन दिसत आहे.
वाचा: 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीची प्री-वेडिंग पार्टी ही इटली आणि फ्रान्स दरम्यान क्रूजवर आयोजित करण्यात आली आहे. सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, दक्षिण फ्रान्सच्या किनाऱ्यावरील क्रूझवरुन २९ मे ते १ जून या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे.राधिका मर्चंट या प्री-वेडिंग पार्टीला गॅलेक्टिक प्रिन्सेसच्या संकल्पनेतून प्रेरित ग्रेस लिंग कॉटरचा एक कस्टममेड ड्रेस परिधान करणार आहे. एरोस्पेस अॅल्युमिनियम तंत्रज्ञानाचा वापर करून हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. हा आउटफिट एक आश्चर्यकारक निर्मिती आहे. रिपोर्टनुसार, या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारसी, थाई, मेक्सिकन आणि जपानी पदार्थ असणार आहेत. त्यामध्ये गोड पदार्थांचा देखील समावेश आहे. प्री-वेडिंग पार्टीचा सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे त्याची अनोखी स्पेस थीम ठरणार आहे.
वाचा: Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा
समोर आलेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट १२ जुलै २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मनोरंजन, राजकारण, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आणि लग्नाला हजेरी लावणार आहेत.
वाचा: अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट
संबंधित बातम्या