मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan Video: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ

Salman Khan Video: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 06, 2024 01:41 PM IST

Salman Khan Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने भन्नाट डान्स केला आहे.

salman_khan Anant Ambani
salman_khan Anant Ambani

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony: भारतीत सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत आणि राधिका १२ जुलै रोजी लग्न करणार आहेत. त्याच्या प्रीवेडींग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान डान्स करताना दिसत आहे.

जस्टिन बीबरने केले परफॉर्म

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी डान्स केला. क्रिडा विश्वापासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत जवळपास सर्वजण उपस्थित होते. मग त्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह, करण जौहर आणि अंतराष्ट्रीय स्टार जस्टिन बीबरने देखील परफॉर्म केले आहे. अभिनेता सलमान खानने देखील या संगीत सोहळ्यात स्वॅगने एण्ट्री केली.
वाचा: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी

 

ट्रेंडिंग न्यूज

वाचा: "तंटा नाय तर घंटा नाय...", 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो पाहिलात का?

सलमान आणि अनंतचा डान्स

अनंत अंबानीयांच्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनंत गाडी चालवत स्टेजवर एण्ट्री करताना दिसत आहे. त्याच्या मागे सलमान खान स्टेजवर येतो. दोघेही गाडीतून उतरुन डान्स करताना दिसतात. 'ऐसा पहली बार हुआ सतरा अठरा सालो में...' या गाण्यावर दोघे डान्स करतात.
वाचा: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी

दरम्यान, अनंत अंबानीने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर सलमान खानने काळ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे. दोघेही या लूकमध्ये हँडसम दिसत होते. सोशल मीडियावर सलमान आणि अनंतच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

 

WhatsApp channel